Raja Shivaji : महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी झालं ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं शूटिंग ?

रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट 'राजा शिवाजी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमावला असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. रितेश, जेनेलियासह अनेक दिग्गज कलाकारांनी यात भूमिका केल्या आहेत. हा भव्य चित्रपट महाराष्ट्रातील अनेक विख्यात ठिकाणी शूट झाला आहे. तुम्हाला माहीत आहेत का ही लोकेशन्स ?

| Updated on: May 03, 2026 | 10:06 PM
1 / 7
रितेश देशमुख याने पाहिलेलं स्वप्न्, त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला 'राजा शिवाजी' चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर अवतरला आहे. 1 मे रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवला असून चांगलाच गल्ला कमावला आहे. तिसऱ्या दिवशीही चित्रपटाची घोडदौड सुरूच असून प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. (All Photos : Social Media)

2 / 7
या चित्रपटात रितेश देशमुख याच्याशिवाय जेनेलिया देशमुख,सलमान खान, संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, बमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी अशा अनेक कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहे. अनेक मराठी कलाकार यात झळकले असून विशेष म्हणजे रितेश देशमुखच्या मुलांचाही यात गेस्ट अपिअरन्स आहे. सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा असून लोकांनाही तो खूप आवडतोय.  तीन दिवसांत चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे.

3 / 7
अनेकांना या चित्रपटाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असून बऱ्याच जणांना काही गोष्टी माहीत नाहीत. अनेकांना असा प्रश्न पडतोय की मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या या भव्य दिव्य चित्रपटाचं शूटिंग नेमकं झालंय कुठे? चला जाणून घेऊया.

4 / 7
कृष्णाबाई मंदिर, महाबळेश्वर - रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला आणि त्यानेच दिग्दर्शित केलेल्या  'राजा शिवाजी' चित्रपटाचं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शूटिंग झालं आहे. सह्यद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक मंदिरात या चित्रपटाचं चित्रीकरण झालं.  महाबळेश्वर येथे असलेलं हे मंदिर विख्यात असून चित्रपटातही य़ा भागाचं दर्शन होतं.

5 / 7
संगम माहुली, सातारा -  'राजा शिवाजी' चित्रपट भव्य बनला आहे, मोठ्या पडद्यावर राजांना पाहताना प्रत्येकाचा ऊर भरून येतो. कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेल्या, ऐतिहासिक स्थळ असलेल्या सातारा जिल्ह्यातील संगम माहुली येथही चित्रपट शूट झाला आहे. युद्ध आणि भव्य दृश्यांसाठी हे लोकेशन निवडलं जातं.

6 / 7
मेणवली घाट , वाई (सातारा)  -  कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे महाराष्ट्रातील एक अत्यंत सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. इथे अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालं आहे. 'राजा शिवाजी'  चित्रपटामधील काही महत्वाची, ऐतिहासिक दृश्य याच ठिकाणी शूट करण्यात आली आहेत.

7 / 7
फिल्मसिटी, मुंबई - येथेही अनेक मोठे सेट्स उभारण्यात आले होते. 'राजा शिवाजी' चित्रपटातील काही महत्वपूर्ण दृश्य,  राजवाडे आणि युद्धाचे अनेक इथेच शूट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटासाठी उभारण्यात आलेले खास सेट्स, तिथे केलेली दृश्य प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जातात. या चित्रपटाल जो भरघोस प्रतिसाद मिळतोय त्यात या लोकेशन्सचाही मोठा वाटा आहे. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)

Follow Us