Rajinikanth Love Life : रजनीकांत लग्नासाठी श्रीदेवीला मागणी घालणार होते, पण तितक्यात जे घडलं, त्या एका संकेताने बदलला विचार

Rajinikanth Love Life : रजनीकांत सध्या आपली मोस्ट अवेटेड फिल्म 'कुली'मुळे चर्चेत आहेत. त्यांचा चित्रपट 14 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सोबतच रजनीकांत यांना चित्रपट सृष्टीत 50 वर्ष पूर्ण होत आहेत.

| Updated on: Aug 11, 2025 | 3:31 PM
1 / 5
रजनीकांत यांच्या चित्रपटांची नेहमीच चर्चा होते. त्यांनी अनेक भाषांमध्ये चित्रपट केला आहे. प्रोफेशनल लाइफशिवाय अभिनेत्याच्या लव्ह लाइफची फार चर्चा झाली नाही. त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल फार कमी लोकांना माहितीय.

2 / 5
एका जुन्या इंटरव्यूमध्ये फिल्ममेकर बालचंदर यांनी  मेगास्टारच्या लव्ह लाइफचा खुलासा केला होता. रजनीकांत यांनी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं. पण या सगळ्या अभिनेत्रींपैकी ते श्रीदेवीच्या प्रेमात पडले. दोघांनी जवळपास 19 चित्रपटात एकत्र काम केलं. लोकांना रजनीकांत आणि श्रीदेवीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप आवडली. याचवेळी एकत्र काम करताना रजनीकांत यांच्या मनात श्रीदेवी बद्दल प्रेमभावना निर्माण झालेल्या.

3 / 5
के बालचंदर यांनी जे सांगितलं त्या नुसार रजनीकांत श्रीदेवीबद्दल खूप सीरियस होते. त्यांना श्रीदेवी सोबत लग्न करायचं होतं. ते श्रीदेवीला लग्नासाठी प्रपोज सुद्धा करणार होते. फिल्ममेकर के बालचंदर यांच्यानुसार, रजनीकांत यांनी विचार केला की, श्रीदेवीच्या घरी गृह प्रवेशाच्यावेळी जायचं आणि त्याचवेळी अभिनेत्रीला लग्नासाठी मागणी घालायची. पण तिथे एक अशी घटना घडली. त्यामुळे त्यांनी प्रपोज केला नाही.

4 / 5
फिल्ममेकरच्या सांगण्यानुसार रजनीकांत यांनी श्रीदेवीच्या घरी पोहोचताच लाईट गेली. सगळ्या घरात अंधार झाला. या घटनेबद्दल रजनीकांत यांनी खूप विचार केला. त्यांना हा इशारा वाटला.

5 / 5
रजनीकांत यांनी या इशाऱ्याला वाईट संकेत मानून अभिनेत्रीला आपल्या मनातलं सांगायचं नाही, असं ठरवलं. त्यामुळे रजनीकांत श्रीदेवीला लग्नासाठी मागणी न घालताच तिथून निघून गेले.