17 वर्षांच्या कारकिर्दीत 7 बायोपिकमध्ये काम, एका चित्रपटात तर चक्क… या अभिनेत्याची सध्या जगभर चर्चा!

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव लवकरच ‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारणार असून, त्यांच्या पहिल्या भेटीची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Oct 12, 2026 | 9:33 PM
1 / 5
उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात राजकुमार राव त्यांची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री वामिका गब्बी निकम यांच्या पत्नी ज्योती निकम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात राजकुमार राव त्यांची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री वामिका गब्बी निकम यांच्या पत्नी ज्योती निकम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

2 / 5

उज्ज्वल निकम यांनी यापूर्वी राजकुमार रावचा कोणताही चित्रपट पाहिला नव्हता. त्यामुळे त्याच्या निवडीबद्दल समजल्यावर त्यांनी, “अविनाश जी, ये कौन राजकुमार है भाई?” असा प्रश्न विचारला.

3 / 5

दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी राजकुमार रावच्या अभिनयाची माहिती निकम यांना दिली. त्यानंतर त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजकुमारची भेट घेतली. त्याचा साधेपणा पाहून निकम म्हणाले, “अरे, रियल एक्टर है. आई लाइक हिज नेचर.”

4 / 5

राजकुमार राव आपली आवाजाची ढब आणि व्यक्तिमत्त्व पडद्यावर कसे साकारणार, हे पाहण्याची उत्सुकता निकम यांना आहे. मात्र, त्यांनी अद्याप राजकुमारचा चित्रपट पाहिलेला नाही.

5 / 5

प्रहार’ ही राजकुमार रावच्या कारकिर्दीतील पाचवी बायोपिक असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर तो माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या जीवनावरील चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे वास्तविक व्यक्तींच्या भूमिका साकारण्याच्या त्याच्या प्रवासात आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us