राजनाथ सिंह यांनी घेतली बीएपीएस संतांची भेट; दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा

Rajnath Singh meets BAPS Saints : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी बीएपीएस स्वामी नारायण संस्थेच्या संताची भेट घेतली. त्यांनी या संतांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजनाथ सिंह यांनी परमपूज्य महंत स्वामी महाराज आशीर्वाद घेतले.

| Updated on: Oct 17, 2025 | 3:08 PM
1 / 6
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नाशिकमध्ये बीएपीएस संतांची भेट घेतली. त्यांनी बीएपीएस स्वामीनारायण संस्थेच्या संतांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आध्यात्मिक प्रेरणा आणि मानव सेवेसाठी संस्थेच्या कार्याची माहिती त्यांना देण्यात आली.

2 / 6
दीपावलीच्या शुभ पर्वावर आज नाशिकमध्ये एक विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे संत यामध्ये सहभागी झाले.

3 / 6
ही भेट अत्यंत सौहार्दपूर्ण झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. आध्यात्मिक विषयासह इतर मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.

4 / 6
राजनाथ सिंह यांनी ऑस्ट्रेलिया येथील सिडनी येथील बीएपीएस स्वामी नारायण मंदिराला भेट दिली होती. त्याचा उल्लेख या भेटीत झाला. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि शाश्वत मूल्यांचे प्रचार-प्रसारसंबंधीची माहिती देण्यात आली. बीएपीएस विश्वभरात एकता, श्रद्धा आणि सेवेच्या भावनेने काम करते.

5 / 6
भारताची प्रगती, शांती आणि सुरक्षेसाठी परमपूज्य महंत स्वामी महाराज यांचे आशीर्वाद मिळाल्याचे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

6 / 6
बीएपीएस संस्था आणि संतांद्वारे एकता, भक्ती आणि निःस्वार्थ सेवाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. एक आध्यात्मिक ऊर्जा, पारस्पर आदर, देशभक्ती आणि श्रद्धेचे ही संस्था प्रतिक असल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले.