Rajpal Yadav : डोक्यावर 9 कोटीचं कर्ज, नवरा तुरुंगात, अखेर राजपाल यादवची पत्नी राधा यादवने सोडलं मौन
Rajpal Yadav : चेक बाऊन्स प्रकरणात कर्ज फेडण्यासाठी राजपालने आणखी मुदत वाढवून मागितली होती. पण दिल्ली हाय कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्याला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं.

काही काळापूर्वी प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावणारा विनोदी कलाकार राजपाल यादव सध्या अडचणीत आहे. चेक बाऊन्स प्रकरणात तो तिहार तुरुंगात आहे. तिहार तुरुंग अधिकाऱ्यांसमोर राजपाल यादवने आत्मसमर्पण केलं.राजपाल यादववर एकूण 9 कोटींच कर्ज आहे.

चेक बाऊन्स प्रकरणात कर्ज फेडण्यासाठी राजपालने आणखी मुदत वाढवून मागितली होती. पण दिल्ली हाय कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्याला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं.

राजपाल यादवने 2010 साली 'अता पता लापता' या चित्रपटासाठी एम/एस मुरली प्रोजेक्टस प्रायवेट लिमिटेडकडून 5 कोटी रुपयाचं कर्ज काढलं होतं. डायरेक्टर म्हणून त्याने या चित्रपटद्वारे डेब्यु केला. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. व्याज पकडून कर्ज 9 कोटीच्या घरात गेलं.

हे कर्ज फेडून राजपालला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी आता फिल्म इंडस्ट्रीतून मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. त्यावर राजपाल यादवची पत्नी राधा यादवने मदतीसाठी आभार मानले आहेत.

प्रत्येक जण राजपालच्या पाठिशी उभा आहे. इंडस्ट्री खूप सपोर्टिव आहे. जे मदत देतायत त्या सर्वांना मनापासून धन्यवाद असा राधा यादवने म्हटलय. अभिनेता सोनू सूद, गुरमीत चौधरी आणि संगीत दिग्दर्शक राव इंद्रजीत यादव हे राजपाल आणि त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी पुढे आलेत. त्यांनी इतरांना सुद्धा असच करण्याचं आव्हान केलय.