
प्राण प्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला मेक्सिकोच्या केरेतारो शहरात राम मंदिराची स्थापना झाली आहे. मेक्सिकोतील भारतीय दूतावासाने हे फोटो पोस्ट केलाय.

राम मंदिरात स्थापनेसाठी भारतातून या मुर्ती आणण्यात आल्या आहेत. अमेरिकन पूजाऱ्याने पूजा केली.

आज भारतात अयोध्येच्या राम मंदिरात प्राण प्रतिष्ठेचा सोहाळा झाला. त्यावेळी परदेशातील मंदिरात देखील राम मुर्तीची स्थापना करण्यात आली.

राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा असल्याने मुंबईतही वेगवेगळ्या भागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भायखळा न्यु रिबेका हाऊसिंग सोसायटीमधलया रहिवाशांनी शोभा यात्रेचे आयोजन केले होते.