
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chh. Shivaji Maharaj) समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडवर (Raigad) आज येत आहेत. राष्ट्रपती रामानथ कोविंद चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं रायगड किल्ल्यावर जय्यत तयारी केली आहे. यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहोत

राज सदरेवरील शिवाजी महाराजांचा महाराजांचा पुतळा, होळीच्या माळावरील महाराजांचा पुतळा. समाधी जवळील श्रीजगदीश्वर मंदीर परीसर राष्ट्रपती महोदयांसाठी सर्व रायगड लाल कार्पेट, फुलं, रोषणाईने सज्ज करण्यात आला आहे.

राष्ट्रपतींकरीता प्रशासनाने रायगड किल्ला सुदंर सजवलेला असल्याने असेच चित्र सामान्य शिवप्रेमींसाठी असावं, अशी इच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

रायगडावर कुणी तरी अस्थी ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा वाद झाला

राष्ट्रपती रामानथ कोविंद 6 ते 9 डिसेंबर या चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज रायगडला ते भेट देतील. लोहगाव पुणे येथील एअर फोर्स स्टेशनला 7 डिसेंबरला भेट देतील. तर, 8 डिसेंबरला मुंबईत मिसाईल वेसेल स्काड्रन कार्यक्रमाला उपस्थित राहतील.