रणबीर कपूरने गुंतवणूक केलेला स्टॉक ‘फोकस’मध्ये, एका वर्षात 109 टक्क्यांचा रिटर्न

Ranbir Kapoor Share Market: बॉलिवूड स्टार रणबीर कपूर याने गुंतवणूक केलेल्या या कंपनीचा स्टॉक काल चांगलाच चमकला. या शेअरने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 109 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. या कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

| Updated on: May 30, 2026 | 4:59 PM
1 / 6
Ranbir Kapoor Share Market: रणबीर कपूर याने गुंतवणूक केलेली कंपनी प्राईम फोकसचा शेअर काल बाजारात वधारला. या शेअरमध्ये काल बाजार सुरू होताच दोन टक्क्यांची तेजी दिसली. पण बाजार बंद होताना हा स्टॉक तीन टक्क्यांहून अधिकने घसरला. कंपनीने तिमाही निकालांची घोषणा केली आहे.

2 / 6
शुक्रवारी हा शेअर 240 रुपयांनी बीएसईवर उघडला. त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये रिकव्हरी दिसली. हा शेअर 240 रुपयांहून थेट 247.40 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहचला. बाजार बंद होताना या शेअरमध्ये तीन टक्क्यांहून अधिकची घसरण झाली. हा शेअर घसरणीसह 233.70 रुपयांवर बंद झाला.

3 / 6
मार्च महिन्याच्या तिमाहीत कंपनीने जोरदार प्रदर्शन केले. जानेवारी ते मार्च 2026 या काळात कंपनीने निव्वळ 82 कोटींचा नफा मिळवला. एका वर्षापू्र्वी समान कालावधीत कंपनीने 231 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. तिमाही आधारावर प्राईम फोकसचा निव्वळ नफा 16 टक्क्यांनी वधारला. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 71 कोटी रुपये इतका होता.

4 / 6
कंपनीच्या महसूलात वार्षिक आधारावर 42 टक्क्यांची वाढ झाली. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीचा महसूली आकडा 1375 कोटी रुपये इतका होता. एका वर्षापूर्वी कंपनीचा महसूल 967 कोटी रुपये इतका होता. त्यामुळे कंपनीच्या महसूलातही चांगली वाढ झाल्याचे दिसते.

5 / 6
कंपनीचा शेअर चर्चेत आहे. एका वृत्तानुसार, रणबीर कपूर या कंपनीत प्रफरेंशियल इश्यूच्या माध्यमातून या कंपनीत मोठी रक्कम गुंतवणूक करणार आहेत. त्यातून रणबीर कपूर याला एकूण 12.50 लाख शेअर मिळतील. गेल्या एका वर्षात या शेअरने चांगली कामगिरी केली आहे. एका कंपनीने गुंतवणूकदारांना 109 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us