Ramayana Box Office Collection : परदेशातही सुपरहिट ठरलेल्या रामायणने सर्वात जास्त कमाई कुठल्या देशात केलीय? चीन, रशियामध्ये अजून रिलीज व्हायचाय

Ramayana Box Office Collection : रणबीर कपूरचा रामायण चित्रपट रिलीज होऊन तीन आठवडे झाले आहेत. या फिल्मच्या कमाईचे ताजे आकडे आले आहेत. हा चित्रपट परदेशात बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरतोय.

| Updated on: Nov 28, 2026 | 9:41 PM
1 / 5
रामायण चित्रपट रिलीज होऊन तीन आठवडे उलटून गेले आहेत. पण तरीही हा चित्रपट चांगली कमाई करतोय. या फिल्मच्या कमाईचे ताजे आकडे आलेत. फिल्मच्या रिलीजला 23 दिवस पूर्ण झाले आहेत. या 23 दिवसात अनेक रेकॉर्ड या चित्रपटाने आपल्या नावावर केले आहेत.

रामायण चित्रपट रिलीज होऊन तीन आठवडे उलटून गेले आहेत. पण तरीही हा चित्रपट चांगली कमाई करतोय. या फिल्मच्या कमाईचे ताजे आकडे आलेत. फिल्मच्या रिलीजला 23 दिवस पूर्ण झाले आहेत. या 23 दिवसात अनेक रेकॉर्ड या चित्रपटाने आपल्या नावावर केले आहेत.

2 / 5

रामायण चित्रपट 100 पेक्षा जास्त देशात रिलीज करण्यात आलेला. ताज्या रिपोर्ट्सनुसार ही फिल्म 27 देशात सुपरहिट झाली. ही एक मोठी बाब आहे. अजून हा चित्रपट चीन, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये रिलीज झालेला नाही.

3 / 5

या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय बाजारातही आपलं वर्चस्व सिद्ध केलय. स्लोवाकिया, यूक्रेन, लातविया, जॉर्जिया, आर्मेनिया, कंबोडिया, वियतनाम, घाना आणि केनिया सारख्या देशात या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे.

4 / 5

रामाणयाने जागतिक बाजारात करिश्मा करुन दाखवला आहे. ही फिल्म अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया, कॅनडा, नेपाळ आणि ब्रिटन सारख्या देशात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

5 / 5

हा चित्रपट रिलीज झाल्यापासून 23 दिवसात या फिल्मने 1000 कोटी रुपयांची कमाई केल आहे. दुसरीकडे या फिल्मने ग्रॉस कलेक्शनच्या बाबतीत 1195 कोटी रुपये कमावले आहेत. जगभरात या सिनेमाने 595 कोटींची कमाई केली आहे. कलेक्शनचे हे आकडे एकत्र केले तर या चित्रपटाने 23 दिवसात वर्ल्डवाइड 1790 कोटींचं कलेक्शन केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us