
नुकताच शाहरुख खान याचा लेक आर्यन खान याने त्याच्या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगला सुरूवात केलीये. आर्यन खान याने दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केलीये.

आर्यन खान याच्या या वेब सीरिजमध्ये लक्ष्य लालवानी हा मुख्य भूमिकेत असून या वेब सीरिजचे सहा भाग हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. वरळीमधील एका मिलमध्ये या वेब सीरिजची शूटिंग सुरू आहे.

स्टारडम असे आर्यन खान याच्या वेब सीरिजचे नाव आहे. आता आर्यन खान याच्या या वेब सीरिजबद्दल अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी पुढे येत आहे. या वेब सीरिजमध्ये दोन महत्वाचे कॅमिओ असणार आहेत.

आर्यन खान याच्या वेब सीरिजमध्ये बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचा कॅमिओ होणार असल्याची चर्चा आहे. फक्त रणबीर कपूर याचाच नाही तर करण जोहर याचीही एक झलक सीरिजमध्ये बघायला मिळणार आहे.

काॅल टाईमिंगच्या अगोदर सेटवर आर्यन खान उपस्थित होता. इतकेच नाही तर लेकाला शुभेच्छा देण्यासाठी शाहरुख खान हा देखील सेटवर पोहचला असल्याचे सांगितले जात होते.