
यंदाच्या वर्षी तुम्हीही आकर्षक रांगोळ्यांनी दाराची शोभा वाढवा. 'या' सोप्या आणि साध्या रांगोळ्या काढून या वर्षी दसरा साजरा करा

दारासमोर रांगोळी काढल्यामुळे मन देखील प्रसन्न राहतं. अनेकांना रांगोळी काढायला प्रचंड आवडते. त्यामुळे रांगोळ्या शोधल्या जातात.

काहींना रांगोळ्या काढायला जमत नाहीत. त्यामुळे या सोप्या आणि साध्या रांगोळ्या काढणं योग्य ठरतं. पण दसऱ्या दिवशी रांगोळीमध्ये लाल, हिरवा आणि पिवळा रंग असणं महत्त्वाचं असतं... असं देखील म्हणतात.

अशा काही रांगोळ्या ज्या अगदी साध्या आहेत आणि काढण्यासाठी अधिक वेळ देखील लागत नाही. त्यामुळे तुम्ही यंदाच्या वर्षी आकर्षक रांगोळ्या काढू शकता.

अनेक महिला नोकरी किंवा स्वतःच्या व्यवसाय करतात. म्हणून काम सांभाळून तयारी करण्यात महिलांना प्रचंड त्रास होतो. अशात इंटरनेट आणि सोशल मीडियावर देखील रांगोळ्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.