
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा लूक खूप आवडला आहे. चाहत्यांना प्रत्येक वेळी तिचा नवा लूक पाहायला मिळतो. यावेळीही रणवीर विमानतळावर एका वेगळ्या लूकमध्ये दिसला.

रणवीर आज सकाळी मुंबईत परतला आहे. त्याचा विमानतळ लूक पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. यवेळी गुचीच्या कपड्यांमध्ये दिसला.या कपड्यांसोबतच त्याने ऑनिमल प्रिंन्टेड पॅन्टसुद्धा घातली आहे. तो नुकताच दुबईवरुन आला आहे.

या वेळी रणवीरने सूट घातला आहे. या फोटोमध्ये तपकिरी रंगाचा ड्रेस घातला आहे. हेअरस्टाईलमध्ये त्याने दोन वेणी घातल्या आहेत.

रणवीरचा हा लूक व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर चाहते फोटोवर खूप कमेंट करत आहेत. एका यूजने लिहिले आहे की या लूकमध्ये तू किलिंग दिसत आहे. त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले - शतकातील महान नायक अशी कमेंट लिहली आहे.

रणवीरने अलीकडेच टीव्हीवर पदार्पण केले आहे. त्याचा क्विझ रिअॅलिटी शो द बिग पिक्चर शनिवारपासून सुरू झाला आहे. हा शो प्रेशकांच्या पसंतील उतरला आहे. लवकरच त्याचा 83 हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.