
आचार्य चाणक्य यांच्या नीतिंबाबत आपण नेहमीच वाचत असतो. पण बहुतेक लोक हे विचार अंमलात आणऊ शकत नाहीत. चाणक्य नीति (Chanakya Niti) जीवनात धर्म, शांती आणि शिक्षाच्या प्रत्येक बाजूबद्दल शिक्षा देण्याचं काम करतात. प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहाते. मात्र, चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपण फाॅलो केल्यातर आपल्या आयुष्यामध्ये कधीही पैसांची कमी होणार नाही.

चाणक्य म्हणतात की, अशा काही ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने पैसा खर्च करताना अजिबात विचार करूनये. विशेष म्हणजे त्या खास ठिकाणी पैसा जास्त खर्च केला तर सुख-समृद्धी वाढते.

चाणक्य म्हणतात की गरजूंना मदत करताना कधीही पैसांचा विचार करू नका. शक्य असल्यास, आपल्या उत्पन्नाचा ठराविक भाग नेहमी गरीबांवर खर्च करा.

चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की या धर्मात केलेली सत्कर्मे पुढील अनेक जन्मांपर्यंत व्यक्तीसोबत राहते, त्यामुळे जास्तीत जास्त परोपकारी कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

समाजाशी संबंधित कामात गुंतवलेले पैसे व्यक्तीला खूप सन्मान आणि प्रगती मिळवून देतात. यामुळेच आपले पैसे सामाजिक कार्यात द्यावेत.