
न्याय आणि कर्माचा देवता असलेला ग्रह शनीदेव लकरच स्वत:च्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात गोचर करणार आहे. हा महायोग साधारण 27 वर्षांनी पुन्हा एकदा घडून येत आहे. शनी ग्रह लवकरच आपली चाल बदलणार असल्याने त्याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. उत्तरा भाद्रपद हे एकूण 27 नक्षत्रांमधील 26 व्या क्रमांकाचे नक्षत्र आहे.

उत्तरा भाद्रपद हे नक्षत्र मीन राशी अंतर्गत येते. शनीच्या या नक्षत्रबदलामुळे एकूण पाच राशींचे नशीब उजळणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी, व्यवसायात मोठे यश मिळणार आहे.

तसेच या पाच राशींच्या लोकांच्या नशीबात मोठी धन-संपत्ती येऊ शकते. तसेच त्यांच्या आयुष्यात अनेक आनंददायी घटना घडू शकतात. येत्या 18 ऑगस्ट रोजी शनी ग्रह उत्तरा भाद्रपद नक्षात प्रवेश करणार आहे.

शनीच्या गोचरचा वृषभ राशीवर सकारात्मक परिणाम पडणार आहे. या राशीला त्याचा मोठा फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना धनप्राप्ती होईल. प्रगती करण्याची संधी मिळेल. जोडीदार तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देईल.

शनीच्या गोचरचा मिथून राशीवरही प्रभाव पडणार आहे. मिथून राशी असलेल्या विद्यार्थ्यांवर शनी देवाची कृपा असेल. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील. तसेच या काळात चांगली नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. व्यवसायातही आर्थिक सुधारणा होईल.

शनीच्या या गोचरमुळे सिंह राशीच्या लोकांनाही फायदा होईल. या राशीच्या लोकांना नशीब साथ देईल. तसेच या लोकांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान असेल. पालाकांची आपल्या पाल्याच्या बाबातीत असलेली चिंता दूर होईल. कन्या राशीलाही शनीच्या गोचरचा फायदा होईल. कन्या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. कार्यालयाचे टार्गेट पुण होईल. या काळात घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.

तुळ राशीलाही शनीच्या गोचरचा फायदा होईल. तुळ राशीच्या लोकांमध्ये या काळात सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळेल. तसेच आरोग्य चांगले राहील. तुम्हाला तुमचा स्वत:चा व्यवसाय उभा करायला चांगली मदत होईल. कमाईच्या बाबतीत तुम्ही तुमच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असाल.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.