
मंगळ ग्रहाने त्याच्या स्वत:च्या वृश्चिक राशीमध्ये गोचर केले आहे. या गोचरनंतर त्रिकोण राजयोग निर्णाण झाला आहे. याच त्रिकोण राजयोगामुळे आता तीन राशींचे नशीब फळफळणार आहे. या राशींवर पैशांचा पाऊस पडू शकतो, असे बोलले जात आहे.

यामध्ये पहिल्या क्रमांकावर मेष राशी आहे. त्रिकोण राजयोगामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात नोव्हेंबर महिन्यात मोठे परिवर्तन होणार आहे. या काळात अडकलेली संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तसेच संपत्ती कमवण्याचे नवे रस्ते मिळू शकतात.

कर्क राशीलाही या त्रिकोण राजयोगाचा फायदा होमार आहे. कर्क राशीच्या लोकांना नोव्हेंबर महिन्यात हवी ती नोकरी मिळू शकते. या महिन्यात कर्क राशीच्या लोकांचे उत्तन्न वाढू शकते. विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे योग जुळून येतील.

त्रिकोण राजयोगामुळे सिंह राशीच्या लोकांचेही नशीब फळफळणार आहे. या राजयोगामुळे सिंह राशीच्या लोकांवर त्यांचा बॉस आनंदी होऊ शकतो. तुम्हाला चांगली जबाबदारी मिळू शकते. मुलं आनंदाची बातमी देऊ शकतात. तुमचे अडकलेले काम होऊ शकते. धनप्राप्ती होऊ शकते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.