
सूर्य आणि चंद्रग्रहण ठरावीक कालावधीनंतर होत असते. याचा परिणाम मानवी जीवनावर होतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगितंल जातं. 28 ऑक्टोबर रोजी चंद्रग्रहण होणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेसोबतच चार दुर्मिळ योग तयार होत आहेत. ज्यामध्ये चंद्र आणि गुरूच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होत आहे. त्याचबरोबर रवियोग, बुधादित्य योग, षष्ठ योग आणि सिद्धी योगही या दिवशी तयार होत आहेत.

चंद्रग्रहणाच्या दिवशी हे शुभ योग तयार होत असल्याने तीन राशींच्या जातकांना लाभ मिळेल. यात मिथुन, मकर आणि कुंभ राशीच्या जातकांना लाभ मिळेल.

चंद्रग्रहण रात्री 01:06 वाजता सुरू होईल आणि रात्री 02:22 वाजता संपेल. भारतातील या ग्रहणाचा एकूण कालावधी 1 तास 16 मिनिटे आहे.

सुतक चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. सुतक कालावधी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:52 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहण काळात अन्न सेवन करू नये, असं सांगितलं जातं.

ग्रहण काळात नकारात्मकता वाढते. अशी स्थिती टाळण्यासाठी भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. देवाच्या मंत्रांचेही पठण करावे. यावेळी शिजवलेल्या अन्नात तुळशीची पाने ठेवावीत. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)