
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

नवीन काहीतरी शिकण्याचा दिवस असेल. गेल्या काही दिवसांपासून असलेली इच्छा पूर्ण होईल. कामात पूर्णपणे व्यस्त राहाल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

तुम्हाला तुमच्या परिश्रमाचं अपेक्षित फळ आज मिळेल. दिवस पूर्ण उत्साहवर्धक असणार आहे. काम पटकन आटोपल्याने डोक्यावरचा भार हलका होईल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग केसरी राहील.

लक्ष्य गाठण्यासाठी बुद्धिसोबत मनाची साथ मिळाली पाहीजे. आज द्विधा मनस्थिती राहील. पण लक्ष्य सोडू नका. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 5 आणि शुभ रंग नारंगी राहील.

आजच्या दिवशी लक्ष ठेवून काम कराल. कारण एखादी चूक तुम्हाला महागात पडू शकते. कदाचित बॉसचा ओरडा ऐकावा लागू शकतो. तब्येतीकडे लक्ष द्याल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.

घाई गडबडीत कोणतंही काम करू नका. केलेल्या कामाचं मूल्यांकन करा. रिकाम्या वेळेत मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे निर्णय घेताना मदत होईल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आजचा दिवसात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकते. तसेच अकारण पैसा खर्च होत असेल तर लगाम लावा. भविष्यात आर्थिक चणचण भासू शकते. शुभ अंक 11 आणि शुभ रंग लाल राहील.

आरोग्याकडे लक्ष केंद्रीत करा. जवळ असलेल्या पैशांची व्यवस्थितरित्या गुंतवणूक करा. काही गोष्टींकडे कानाडोळा केलेलंच बरं असतं. त्यामुळे वाद होत नाहीत. शुभ अंक 25 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

आजचा दिवशी तुमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. मित्र आणि कुटुंबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणीही आनंदी वातावरण राहील. तुमच्या वागण्याने अनेक जण आकर्षित होतील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग हिरवा राहील.

काही घडामोडी अशा घडतात की त्यामुळे आत्मविश्वास चांगलाच वाढतो. असाच आजचा दिवस आहे. पण वास्तवापेक्षा वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर फटका बसू शकतो. शुभ अंक 10 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)