
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

गेल्या काही दिवसांपासून लागून असलेली चिंता दूर होईल. अचानक एखादी व्यक्ती मदतीसाठी उभी राहील. त्यामुळे त्यांचे उपकार आयुष्यभर विसरू नका. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

आपण रोज करत असलेल्या कामात बदल करणं गरजेचं आहे. नाहीतर कामात तोच तोचपणा येईल. त्यामुळे बदल करा आणि पुढे जा. बदल काळाची गरज आहे लक्षात ठेवा. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

आजचा दिवस तणावपूर्ण जाईल.गाडी जरा जपून चालवा. अपघात होण्याची शक्यता आहे. बॉससोबत काही कारणावरून वाद होऊ शकतो. मतभेद सामंजस्यपणे दूर करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

कधी कधी आपण विचार केला नाही अशा घटनाही घडतात. त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. असाच हा आजचा दिवस आहे. अनपेक्षितपणे घडामोडी घडतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

नातेवाईक कितीही वाईट असले तरी त्यांना कार्यक्रमांना बोलवावं लागतं. खोटं खोटं हसावं लागतं. असंच काहीसं करावं लागेल. आपली प्रगती पाहून जळफलाट होईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

काही लोकं आपल्याला कायम प्रेरणा देत असतात. त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. जुने वाद विसरून नव्याने आयुष्याकडे पाहा. प्रगतीची नवी शिखरं गाठा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

कायदेशीर प्रकरणात यश आपल्या बाजूने येईल. पण यशाने हुरळून जाऊ नका. सर्व कागदपत्रं व्यवस्थितरित्या जपून ठेवा आणि निकालात काय म्हंटलं आहे याचा अभ्यास करा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवासात काळजी घ्या. अस्वस्थ वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तब्येत साथ नसेल तर कामं पुढे ढकला आणि आराम करा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. त्यामुळे पैसा खेळता राहील. एका धंद्यातील गुंतवणूक दुसऱ्या धंद्यात करताना काळजी घ्या. नाहीतर भविष्यात मोठा फटका बसू शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)