
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला काही गोपनीय गोष्टींबद्दल देखील कळू शकते. शुभ अंक 50 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. पर्यटनाशी संबंधित लोकांना आर्थिक फायदा होईल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

आज तुमची सर्व महत्वाची कामे पूर्ण होतील. संयमाने निर्णय घेतल्यास यशाच्या नव्या संधी खुल्या होऊ शकतात. तुमचे आरोग्य चांगले राहील.शुभ अंक 1 आणि शुभ रंग लाल राहील.

आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. पैशाच्या बाबतीत लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळावे. एखाद्याला पैसे उधार देण्यापूर्वी विचार करा. भविष्याचा थोडा विचार करण्याची गरज आहे. शुभ अंक 21 आणि शुभ रंग क्रीम राहील.

तुमचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही तुमच्या आयुष्यात काही चांगले बदल करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या वागण्यात काही चांगले बदल होतील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग जांभळा राहील.

आज समस्यांवर उपाय निघू शकतात. तुमचे मन प्रसन्न राहील. गेलेले पैसे पैसे अचानक परत मिळतील. तुम्हाला इतरांना मदत करण्याची संधी मिळू शकते. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. आज तुमचे लक्ष तुमचे काम पूर्ण करण्यावर असेल.तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. आज जे काही काम सुरू कराल ते वेळेवर पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळू शकते. तुमचे आरोग्य चांगले राहील. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला जाईल. काही विशेष कामात यश मिळू शकते.तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यावसायिकांना फायदा होईल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)