Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 16 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jan 15, 2024 | 8:52 PM
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10

नात्याला गोडवा देणारा आजचा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेली भीती दूर होईल. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

3 / 10

जुन्या जाणत्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे आठवणींना नवा कोंब फुटेल. क्षणात भुतकाळात गेल्यासारखं होईल. जेवणाचा बेत आखाल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10

आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करा. आत्मविश्वास वाढल्यानंतर कामं झटपट पूर्ण होतील. विनाकारण चिंता करणं सोडून द्या. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10

वाईट दिवस काढल्यानंतर चांगल्या दिवसांची आठवण येते. त्यामुळे कायम एकमेकांचा आदर करा. आपल्या काही इच्छा उशिरा का होईना पूर्ण होतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10

गरज प्रत्येकाला असते, त्यामुळे तिरस्कार करणं टाळा. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडेल. तसेच गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10

आयुष्यात कधी ना कधी जोखिम घेण्याची वेळ येते. त्यामुळे भविष्याचा अंदाज घेऊन बांधणी करा. आर्थिक स्थिती चांगली असली सावध पावलं टाका. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10

निंदकाचं घर कायम शेजारी असावं अशी म्हण आहे. जर आपली निंदा कोणी केलीच नाही तर आपल्याला कळणारच नाही. त्यामुळे कोण काय बोलतं याचा विचार न करता पुढे जा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10

दुसऱ्यांकडून आपल्याला मदत मिळेल या आशेवर राहणं चुकीचं आहे. आपणच यासाठी तयारी करून ठेवली पाहीजे. कायदेशीर प्रकरणाला सामोरं जावं लागू शकतं. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

10 / 10

प्रत्येकाला जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे डोकं शांत ठेवा आणि पुढचा मार्ग हाताळा. प्रवासादरम्यान त्रास होऊ शकतो. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us