Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 10 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jan 09, 2024 | 6:53 PM
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10

काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण काळजी न करता त्याचा सामना करा. कदाचित काही ना काही मार्ग सापडेल. मित्रांकडून मदत होईल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10

प्रत्येक वेळी काही ना काही चुकीचं घडत असेल तर आत्मपरीक्षण करा. कारण आपल्या आडमुठ्या भूमिकांमुळे फरक पडू शकतो. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

4 / 10

प्रत्येक वेळी नशिबाची साथ मिळेल असं होत नाही. कधी कधी एक पाऊल मागेही यावं लागतं. ठरवून दिलेल्या योजनांवर काम करा. विनाकारण पैसा खर्च करू नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10

पैशांचा सोंग करता येत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे उगाचच दिखाऊबाजी करण्यात वेळ घालू नका. आहे त्या परिस्थितीत जगा आणि मेहनत घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10

काही नुकसान भरून न काढणारं असतं. त्यामुळे मनावर खोलवर जखम होईल. जास्त विचार करू नका. मित्रमंडळी किंवा घरच्यांसोबत वेळ व्यतित करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10

आपण एखादी गोष्ट व्यवस्थितरित्या केली की त्याचा निकालही बरोबर येतो. आजचा दिवस एकदम मस्त जाईल. व्यवसायात प्रगती दिसून येईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10

आपल्या वाणीचा प्रभाव इतरांवर पडेल. त्यामुळे लोकं तुमच्याकडे आकर्षित होतील. कौटुंबिक वाद टाळा आणि सामंजस्यपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10

भावकीच्या वादातून सुटका होऊ शकते. न्यायालयीन प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. त्यामुळे कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10

आपल्या एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी कठोर मेहनत घेणं गरजेचं आहे. त्यासाठी प्लानिंग करा आणि वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us