अवघड-आव्हानात्मक काळ आणि वर्षभर अडचणी; या 3 राशींवर शनीची साडेसाती

Shani Sade Sati Effect On 3 Zodiacs : शनीची साडेसाती हा सर्वात आव्हानात्मक काळ असतो. शनीच्या साडेसातीचा राशींवर सर्वाधिक परिणाम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्या 3 राशीच्या लोकांना सतर्क आणि सावध रहावं लागणार आहे. जाणून घ्या त्या 3 राशी कोणत्या आहेत?

| Updated on: Apr 26, 2025 | 6:59 PM
1 / 6
शनीची गती इतर सर्व ग्रहांच्या तुलनेत सर्वात संथ आहे. त्यामुळेच शनि एकाच राशीत बराच काळ असतो. त्यामुळे संबंधित राशीवर त्याचे परिणाम पाहायला मिळतात. शनी ग्रहाच्या संक्रमणामुळे साडेसातीच्या प्रभावाखाली असलेल्या राशीच्या लोकांनी सावध रहायला हवं. (Photo Credit : Tv9)

2 / 6
मेष राशीची साडेसाती सुरु झाली आहे.  कुंभ राशीची साडेसाती शेवटच्या टप्प्यात आहे. तर मीन राशीची साडेसाती ही मधल्या टप्प्यात आहे. त्यामुळे कोणत्या राशीवर शनीच्या साडेसातीचा अधिक प्रभाव असणार? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9)

3 / 6
शनी गोचर झाल्याने मेष राशीवर शनीची साडेसाती सुरू झाली आहे.मेष राशीवर साडेसतीचा प्रभाव दिसेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. शत्रूसह असलेल्या समस्येत वाढ होईल.  मेष राशीच्या लोकांनी प्रत्येक क्षेत्रात सावधगिरी बाळगावी. नशिबाची पूर्पपणे साथ मिळेलच, असं नाही. आयुष्यात अशांतता येऊ शकते. वाईट परिस्थितीतही संयम राखावा लागेल. (Photo Credit : Tv9)

4 / 6
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झालाय. शनी ग्रहाच्या संक्रमणामुळे कुंभ राशीच्या लोकांना सरत्या साडेसातीच्या परिणामांचा सामना करावा लागू शकतो. याचा अडीच वर्ष इतका कालावधी आहे. या काळात कुंभ राशीवर साडेसातीचा संमिश्र परिणाम पाहायला मिळेल. काही बाबतीत सकारात्मक निकाल पाहायला मिळतील. मात्र अडचणी कायम राहतील.  कौटुंबिक आनंद कमी होईल, ज्यामुळे ताण-तणाव वाढण्याची शक्यता आहे.  (Photo Credit : Tv9)

5 / 6
शनी ग्रहाच्या संक्रमणामुळे मीन राशीच्या लोकांसाठी साडेसातीतील मधला टप्पा सुरू झालाय. पहिली अडीच वर्षे संपली आहेत. मात्र मधल्या टप्प्यात मीन राशीच्या लोकांनी सावध राहणं गरजेचं आहे. काळ आव्हानात्मक असू शकतो. शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कमी आत्मविश्वासामुळे कामं अर्धवट राहतील. तसेच कामात अडथळा येऊ शकतो.  जोडीदारासह खटके उडू शकतात किंवा नातं आणखी दृढ होऊ शकतं. करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. (Photo Credit : Tv9)

6 / 6
शनीचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावं. शनिवारी झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. भगवान शंकर आणि हनुमानाची पूजा करा. गरजूंना दान करा. (Photo Credit : Tv9) (Disclaimer: वरील माहिती ही सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.)