
मनासारखे प्रेम मिळावे किंवा मनासाराखा जोडीदार मिळावा यासाठी अनेकजण ज्योतिषांचा सल्ला घेतात. अनकवेळी मनसारखा जोडीदार मिळावा यासाठी बोटात अंगठीच्या रुपात वेगवेगळी रत्ने घातली जातात. कुंडलीतील ग्रहांची दशा पाहूनच ही रत्ने धारण केली पाहिजेत. दरम्यान, अशी तीन रत्ने आहेत, जी तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं प्रेम मिळवून देऊ शकतात तसेच तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळवून देऊ शकतात.

रत्नशास्त्रानुसार गुलाब क्वॉट्ज हे एक विशेष रत्न आहे. हे रत्न गुलाबी रंगाचे असते. प्रेमाच्या संदर्भात काही अडचणी असतील तर ज्योतिष हे रत्न परिधान करण्याचा सल्ला देतात. तुम्हाला आदर्श जोडीदार हवा असेल किंवा प्रियकराचे प्रेम मिळवायचे असेल तर हेर रत्न बोटांमध्ये घालता येईल.

ओपल रत्नधारण केल्यास कुंडलीतील शुक्र बलवान होतो असे म्हटले जाते. यामुळे भैतिक सुख, प्रेम मिळते तसेच संपत्तीतही वाढ होते. हे रत्न धारण करणाऱ्याचे सौंदर्य वाढते. तसेच त्या संबंधित व्यक्तीकडे लोक आकर्षित करतात. ओपल रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमाचे दरवाजे खुलतात.

मूनस्टोन धारण करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात अलौकिक शक्तीची प्रचिती येते. हे रत्न धारण केल्यास भावना नियंत्रित राहतात. तसेच हे रत्न धारण केल्यास जीवनात नेमकं काय करायचं आहे? कोणासोबत राहणं योग्य राही याबाबत मार्गदर्शन मिळते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.