Gold : सोन्याचे दागिने अचानक गायब, बिळात दिसलं असं काही की सगळेच हादरले….CCTV पाहून डोकं चक्रावलं!

या चोरीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. सुरुवातीला ही मोठ्या चोरट्यानेच चोरी केली असावी अला संशय व्यक्त करण्यात आला. परंतु दुकानाचे कुलूप किंवा शटर कुठेही तुटलेले नव्हते. मोडतोड करून प्रवेश केल्याचे कोणतेही पुरावे दिसत नव्हते.

| Updated on: Aug 01, 2026 | 9:36 PM
1 / 5
कर्नाटकातील तुमकुरू येथील कॅलेक्स ज्वेलर्समध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.  सकाळी दुकान उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांना दागिने गायब असल्याचे आढळले. सुमारे 50 ग्रॅम वजनाचे हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने गायब झाल्याचे पाहून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला.

2 / 5

या चोरीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. सुरुवातीला ही मोठ्या चोरट्यानेच चोरी केली असावी अला संशय व्यक्त करण्यात आला. परंतु दुकानाचे कुलूप किंवा शटर कुठेही तुटलेले नव्हते. मोडतोड करून प्रवेश केल्याचे कोणतेही पुरावे दिसत नव्हते.

3 / 5

शेवटी पोलिसांकडे जाण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी CCTV फुटेज तपासले. या फुटेजमध्ये फुटेजमध्ये एक उंदीर दागिने तोंडात धरून नेताना दिसला. तो एकामागोमाग एक असे बरेच दागिने आपल्या बिळात घेऊन जाताना कैद झाला. हे दृश्य पाहून दुकानातील सर्व कर्मचारी आश्चर्यचकित झाले. उंदराचा हा कारनामा सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला.

4 / 5

उंदरानेच दागिने लांबवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उंदराचे बिळ शोधून काढले. बऱ्याच शोधानंतर बिळातून हरवलेले सर्व दागिने सुरक्षित अवस्थेत मिळाले. त्यामध्ये 10 अंगठ्या आणि 3 साखळ्यांचाही समावेश होता.

5 / 5

दरम्यान, दागिने परत मिळाल्याने दुकानदाराने सुटकेचा निश्वास सोडला. या अनोख्या चोरीची सगळीकडेच चर्चा होत आहे. उंदराने केलेल्या या कारनाम्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us