
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन अनेकदा तिच्या फार्महाऊसवर वेळ घालवते. फराह खानच्या नवीन व्लॉगमध्ये अभिनेत्रीने तिच्या फार्महाऊसची झलक दाखवण्यात आली आहे. रवीना येथे पर्यावरणपूरक जीवन जगते. तिच्या घरात 60 वर्षे जुने फर्निचर आणि एक मोठा स्विमिंग पूल यासह अनेक आरामदायी वस्तू आहेत.

रवीना टंडनच्या फार्महाऊसची रचना ही बरीचशी गावातील घरासारखी रचना करण्यात आली आहे. स्वयंपाकघर सुद्धा हे लॅवीश किंवा मॉड्यूलर न करता त्याला गावातील घरांसारखे एक टच देण्यात आला आहे. तिच्या स्वयंपाकघरात मातीची भांडी दिसतात.

रवीना टंडनचे फार्महाऊस बाहेरून देखील खूप सुंदर दिसते. अभिनेत्रीने घराच्या दारावर तिची मुलगी राशाच्या पावलांचे ठसे लावले आहेत. तिच्या मते, तिला अशा प्रकारे आशीर्वाद मिळाला आहे. हा रवीना टंडनच्या फार्महाऊसचा हॉल आहे. अभिनेत्रीच्या मते, तिचे घर ईको फ्रेंडली आहे. हे घर बांधताना दगड वापरण्यात आले आहेत. घरात लाकडांची वापर कमीत कमी करण्यात आला आहे. कारण अभिनेत्रीला झाडे तोडणे आवडत नाही.

स्वयंपाकघर रवीना टंडनच्या फार्महाऊसचे हे एक मोठे आणि अगदी साध्यापद्धतीने बनवण्यात आलेलं स्वयंपाकघर आहे. येथे जुन्या पद्धतीचे टेबल आणि वस्तू ठेवण्यासाठी कपाटही त्याच पद्धतीने तयार केलेले दिसत आहेत. स्वयंपाकघरात मातीच्या भांड्यांचा वापर करण्यात आल्याचं दिसत आहे.

स्विमिंग पूल परिसर: रवीनाच्या फार्महाऊसमध्ये हा एक मोठा स्विमिंग पूल आहे. ही अभिनेत्री अनेकदा तिच्या कुटुंबासह आणि मित्रांसह तिच्या गावातील घरी वेळ घालवण्यासाठी येथे येते. अभिनेत्रीच्या दत्तक मुली देखील त्यांच्या कुटुंबियांसोबत येथे एन्जॉय करतात.

फर्निचर :रवीनाने सांगितले की, तिच्या घरात लाकडाचे असलेले सर्व फर्निचर पुन्हा डिझाइन करून तयार करण्यात आलेले आहे. झाडे वाचवण्यासाठी ती वर्षानुवर्षे जुने फर्निचर वापरत आहे.

डायनिंग एरिआ : रवीना टंडनच्या घरातील हे डायनिंग टेबल सुमारे 60 वर्षे जुने आहे. अभिनेत्रीने सांगितले की हे टेबल तिचे पती अनिल थडानी यांच्या आजी-आजोबांचे आहे.

लॉन एरिया: हा रवीना टंडनच्या फार्महाऊसचा लॉन एरिया आहे. तिथे आजूबाजूला भरपूर झाडी आहेत.तिथे गावासारखे वातावरण अनुभवायला मिळते. रवीना अनेकदा इथे आपला वेळ घालवते.