
IPL 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. दीपक चाहर, एडम मिल्ने दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतर आता रवींद्र जाडेजालाही दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र जाडेजा आचा उर्वरित सामने खेळणार नाही. तो आयपीएल 2022 मधून बाहेर जाऊ शकतो.

रवींद्र जाडेजा दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध खेळताना त्याला दुखापत झाली होती.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रवींद्र जाडेजाच्या दुखापतीवर सीएसकेची मेडीकल टीम नजर ठेवून आहे. अशा परिस्थितीत तो उर्वरित सामन्यांमध्येही न खेळण्याची शक्यता आहे.

रवींद्र जाडेजासाठी आयपीएल 2022 एका वाईट स्वप्नासारख आहे. या डावखुऱ्या फलंदाजाला सीजन सुरु होण्याआधी कॅप्टन बनवण्यात आलं. आठ सामन्यानंतर जाडेजाने कॅप्टनशिप सोडली. त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी चांगली होत नव्हती. पुन्हा एकदा धोनी कॅप्टन झाला.

रवींद्र जाडेजाने या सीजनमध्ये 10 सामन्यात 19.33 च्या सरासरीने 116 धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये त्याला पाच विकेट मिळाल्यात. त्याशिवाय फिल्डिंग करतानाही त्याच्याकडून काही झेल सुटलेत.