तुम्हीही कच्चा कांदा खाता का? मग आजपासूनच बंद करा, नाहीतर पश्चात्ताप होईल

कच्चा कांदा खाणे खरोखरच फायदेशीर आहे की ते आजारांना निमंत्रण देते? कच्चा आणि शिजवलेला कांदा यांच्यातील आरोग्यदायी फरक आणि तज्ज्ञांचा सल्ला या लेखात सविस्तर वाचा.

| Updated on: Jan 27, 2026 | 4:27 PM
1 / 8
भारतीय स्वयंपाकघरात कांद्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. मग ती चविष्ट बिर्याणी असो किंवा ताटातली सॅलडची डिश, कांदा हा हवाच. पण कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी जास्त चांगले आहे की शिजवलेला कांदा? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

2 / 8
पोषणतज्ज्ञांच्या मते, आपण ज्या पद्धतीने कांदा खातो त्यावर त्याचे फायदे आणि तोटे अवलंबून असतात. कच्चा कांदा चवीला चांगला असला तरी, तो प्रत्येकासाठी सुरक्षित नसू शकतो आणि काही प्रसंगी तो आजारही पसरवू शकतो.

3 / 8
कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, टॅनिन आणि अल्कलॉइड्स यांसारखे घटक असतात. हे घटक अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करत असले तरी, त्यांचे अतिसेवन शरीरासाठी घातक ठरू शकते. जास्त प्रमाणात कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराची लोह (Iron) आणि कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होऊ शकते.

4 / 8
कांद्यामध्ये FODMAPs मुबलक प्रमाणात असतात, जे प्रत्येकाला सहज पचत नाहीत. यामुळे गॅस, पोटफुगी आणि पोटात पेटके येणे अशा समस्या उद्भवू शकतात. कांदा जमिनीखाली येतो, त्यामुळे त्यावर मातीतील सूक्ष्मजंतू असू शकतात.

5 / 8
नीट न धुता कच्चा कांदा खाल्ल्यास हे जंतू शरीरात शिरून मेंदूवर परिणाम करणाऱ्या 'सिस्टिक सिरोसिस' सारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतात  संशोधनानुसार, निरोगी व्यक्तींमध्येही कच्चा कांदा छातीत जळजळ निर्माण करू शकतो.

6 / 8
तज्ज्ञांच्या मते, कांदा शिजवून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अधिक सुरक्षित आणि फायदेशीर आहे. कांदा शिजवल्यामुळे त्यातील हानिकारक जंतू पूर्णपणे नष्ट होतात. शिजवलेला कांदा पचायला अत्यंत सोपा असतो, ज्यामुळे पोट, छातीशी संबंधित समस्या टाळता येतात.

7 / 8
शिजवल्यामुळे कांद्यातील 'अँटी-न्यूट्रिएंट्स'चा प्रभाव कमी होतो, परिणामी शरीर इतर पोषक घटक आणि खनिजे चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकते. कांदा हा आरोग्यासाठी उत्तमच आहे, फक्त तो खाण्याची पद्धत महत्त्वाची आहे.

8 / 8
जर तुम्हाला कच्चा कांदा खायचाच असेल, तर तो स्वच्छ धुवून आणि मर्यादित प्रमाणातच खावा. मात्र, पोटाचे विकार टाळण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी तज्ज्ञ नेहमीच कांदा शिजवून खाणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.