
बाॅलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने अनेक हिट चित्रपट हे बाॅलिवूडला दिले आहेत. मात्र, रवीना टंडन ही खूप जास्त रागीट अभिनेत्री आहे. रवीना टंडन हिच्या रागाचे काही किस्से आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ज्यावेळी रवीना टंडन ही टिप टिप बरसा पानी या गाण्याचे शूटिंग करत होती. त्यावेळी तिने एका लहान मुलाला चक्क शूटिंगच्या सेटवरून हाकलून दिले होते. यानंतर सर्वजण हैराण झाले.

विशेष म्हणजे हा मुलगा दुसरा तिसरा कोणीही नसून चक्क रणवीर सिंह हा होता. रणवीर सिंह यालाच आपल्या चित्रपटाच्या सेटवरून रवीना टंडन हिने हाकलून दिले होते.

इतकेच नाही तर आपल्या सवतीच्या अंगावर रागामध्ये रवीना टंडन हिने ज्यूस फेकला होता. चक्क एका मोठ्या पार्टीमध्येच रवीना टंडन हिने अनिल थडानी याच्या पहिल्या पत्नीसोबत हे केले होते.

रवीना टंडन हिचा राग अनेकदा चित्रपटाच्या सेटवर देखील बघायला मिळाला. रवीना टंडन हिची मुलगी आता बाॅलिवूडमध्ये डेब्यू करण्यास तयार आहे.