
रेल्वेमध्ये काम करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. जर तुम्ही कलाकार आहात आणि तुमच्याकडे संगीतामध्ये पदवी असेल तर ही मोठी संधी तुमच्याकडे आहे.

पश्चिम रेल्वे मुंबई विभागाकडून कलाकारांसाठी विशेष भरती सुरू आहे. याबद्दलची अधिसूचना देखील रेल्वे विभागाकडून जाहिर करण्यात आलीये.

महिला गायिका आणि महिला नृत्यांगना या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही मोठी संधीच तुमच्यासाठी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. 11 डिसेंबर 2023 पासून ही भरती प्रक्रिया सुरू झालीये.

9 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. मग अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.