
रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे रेल्वेकडून नुकताच भरती प्रक्रियेची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.

कोणार्क रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच केली जाणार आहे.

मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएसची पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 35 पेक्षा जास्त नसावे.

8 जानेवारी 2024 रोजी या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती या घेतल्या जाणार आहेत. 9:30 ते 11:30 पर्यंत उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहवे लागणार आहे.

या भरती प्रक्रियेच्या मुलाखतीसाठी उमेदवारांना कॉन्फ्रेंस हॉल मडगांव, मडगांव रेल्वे स्टेशनला पोहचावे लागेल. परत एकदा लक्षात ठेवा की, 8 जानेवारी 2024 मुलाखत आहे.