पांढरे की लाल? कोणते तांदूळ अधिक फायदेशीर? जाणून घ्या ब्लड शुगर कोणता आहे उत्तम पर्याय
पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत लाल तांदूळ किती अधिक फायदेशीर आहे? रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी नेमका कोणता तांदूळ फायदेशीर ठरतो याबद्दल अधिक जाणून घ्या.

तांदळाच्या तपकिरी आणि पांढऱ्या प्रकारांशिवाय 'लाल तांदूळ' देखील असतो. याचे अनेक फायदे मिळतात, ज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचाही समावेश आहे.
अनेक लोक आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करत आहेत. विशेषतः सध्या लाल तांदूळ जास्त ट्रेंडमध्ये आहे. हेल्दी लाइफस्टाइलवाले आवर्जून हा भात खातात.
तुम्हालाही भात खायला आवडत असेल तर त्यांच्यासाठी लाल तांदूळ हा एक उत्तम पर्याय आहे. कारण १०० ग्रॅम लाल तांदळामध्ये ३५६ कॅलरीज, ७५.५ ग्रॅम कर्बोदके, ९ ग्रॅम प्रथिने, ३ ग्रॅम चरबी (फॅट) आणि ११ ग्रॅम इतके भरपूर फायबर असते. यामध्ये पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत तीन ते चार पट अधिक फायबर असते, आणि तपकिरी तांदळाच्या (ब्राउन राइस) तुलनेतही अधिक फायबर आढळते.
तांदळाचा लाल रंग हा शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आहेत. लाल तांदळात असलेले फिनॉल्स आणि अँथोसायनिन्स कर्बोदकांचे ग्लुकोजमध्ये वेगाने रूपांतर होण्यापासून रोखतात.
याशिवाय या तांदळात हाय फायबर प्रमाणामुळे, हे रक्ताभिसरणामध्ये चरबी आणि कोलेस्ट्रॉल शोषले जाण्यापासून रोखते आणि त्यांना शरीराबाहेर काढण्यास मदत करते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यात याची महत्त्वाची भूमिका असते. (All Photos: Freepik)