AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या क्लिपचा सोर्स सांगण्यास तयार, पण… मनोज जरांगे पाटलांनी घातली मुख्यमंत्र्यांकडे अट

मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचा सोर्स मुख्यमंत्र्यांना सांगण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु सोर्सच्या जीविताला धोका होऊ नये अशी अट घातली आहे. SIT चौकशी सुरू असताना, जरांगे यांनी आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्यांवर पैसे घेतल्याचा आरोप केला.

त्या क्लिपचा सोर्स सांगण्यास तयार, पण... मनोज जरांगे पाटलांनी घातली मुख्यमंत्र्यांकडे अट
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 1:43 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप महाराष्ट्राला ऐकवून खळबळ उडवून दिली होती. या क्लिपमध्ये 500 कोटींचा आरोप करण्यात आला होता. ही क्लिप आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची गंभीर दखल घेऊन एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता एसआयटीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्या क्लिपबाबत पोलिसांनी जरांगे यांना पत्र पाठवलं आहे. त्या क्लिपचा सोर्सही विचारला आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. जरांगे यांनी सोर्स सांगण्याची तयारीही दर्शवली आहे. पण एक अट ठेवली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. क्लिप त्यांच्या मंत्र्याकडे आहेत. आम्ही सुद्धा ऑडिओ क्लिप देण्यास तयार आहोत. तपास कामासाठी क्लिप आवश्यक आहे, असं पत्र आम्हाला आलेलं आहे. ते पत्र आम्ही वकिलाच्या मार्फत देण्यास सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांना सोर्सही द्यायला आम्ही तयार आहोत. पण आमची एक अट आहे. सोर्सच्या जीवाला काही होता कामा नये. त्याचं आश्वासन आम्हाला मिळालं पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पैशाच्या जोरावर बोलत होते

केवळ पैशाच्या जोरावर क्लिपमध्ये बोललं जात होतं. हे मराठा समाजाला कळलं आहे. विरोधात बोलणाऱ्यांना केवळ पैशाचा मोह होता. आरक्षणाशी त्यांचं काही घेणंदेणं नव्हतं. बोलणारे सरकारकडून पैसे घेऊन बोलत होते. हे आता उघड झालं आहे. विरोधात बोलवणाऱ्यांचा धनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, असा दावाही त्यांनी केला.

सोलापूरचं प्रकरण माहीत नाही

सोलापूरमध्ये एकाला मकोका लावण्यात आला आहे. तो मनोज जरांगे यांचा सहकारी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरही जरांगे यानी प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूरचे प्रकरण मला माहीत नाही. राज्यात माझे सहकारी कोण नाही? राज्यात माझे सर्व सहकारी आहेत. सहा कोटी मराठा समाज माझे सहकारी आहेत. माझ्या विरोधात नवीन ट्रेड पडला आहे. कोणाचाही फोटो जोडायचा आणि जुना सहकारी होता म्हणून सांगितलं जात आहे. हा सध्या ट्रेंड सुरू झाला आहे. माणूस नवा आला तरी जुना सहकारी म्हणतोय, असं सांगतानाच सोलापूरच्या प्रकरणाबाबत मला काहीच माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर