
एकमेकांसोबत वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे. घट्ट नात्यासाठी पती पत्नीने एकमेकांसोबत वेळ घालवायला हवा. तुम्ही सोबत जेवू शकता, सिनेमा बघू शकता, फिरायला जाऊ शकता, सोबत घरकाम देखील करू शकता.

नात्यात गरज असते ती एकमेकांना आधार देण्याची. तुमचा जोडीदार जेव्हा संकटात असतो तेव्हा तुम्ही त्याला साथ द्यायला हवी. नात्यातला हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नातं घट्ट करायचं असेल तर समोरच्याला आधार द्या.

नातं कुठल्याही प्रकारचं असो विश्वासावर नातं चालतं! विश्वास असेल तर ते नातं बराच काळ टिकतं. आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा. आपल्या जोडीदाराचा आपल्यावर विश्वास असावा यासाठी नात्यात तितकी पारदर्शकता ठेवा.

relationship advice

कोणताही निर्णय घेताना जोडीदाराला त्याविषयी कल्पना असावी. जोडीदाराला सुद्धा तो निर्णय पटलेला असावा. परस्पर निर्णय घेतल्यास अविश्वास, असुरक्षितता निर्माण होऊ शकते. कुठलाही निर्णय घेण्याआधी त्याबद्दल दोघांमध्ये चर्चा असायला हवी.