
लवकरच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ या कंपनीचा आयपीओ येऊ शकतो. तशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जून 2026 पर्यंत हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे या आयपीओच्या रुपात गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स कमवण्याची संधी निर्माण होऊ शकते, असे बोलले जात आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार या आयपीओच्या माध्यमातून रिलायन्स ग्रुप या कंपनीतील 2.50 टक्के मालकी विकू शकतो. त्यातून 4.5 अब्ज डॉलर्स उभे करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आता लवकरच हा आयपीओ येण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने त्याचे पडसाद ग्रे मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत.

GMP बिगुलनुसार रिलायन्स जिओ या कंपनीचा आयपीओ सध्या ग्रे मार्केटमध्ये 93 रुपये प्रति शेयरवर आहे. रिलायन्स जिओ या कंपनीने अद्याप सेबीकडे आपला डीआरएचपी दाखल केलेला नाही. असे असताना ग्रे मार्केटमध्ये या आयपीओची चर्चा चालू आहे.

रिलायन्स जिओ या कंपनीचा आयपीओ एकूण किती रुपयांचा असेल, या आयपीओचा किंमत पट्टा (प्राईज बँड) किती असेल हे अद्याप ठरवण्यात आलेले नाही. परंतु सामान्यांसाठी या आयपीओची किंमत 1,048 ते 1,457 रुपये प्रति शेअर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)