UPSC: पातूर तालुक्यातील रेणूका केकन हीने तिसऱ्या प्रयत्नात केली युपीएससी क्रॅक

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील रेणूका केकन ही तिसऱ्या प्रयत्नात युपीएससी क्रॅक केली आहे. पातूर तालुक्यातील असे यश मिळवणारी रेणूका पहिली विद्यार्थीनी ठरली आहे.

| Updated on: Mar 12, 2026 | 4:32 PM
1 / 5
मोरणा धरणाच्या कुशीत वसलेल्या पास्टुल या छोट्याशा गावातील कू.रेणुका केकन हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. पातूर तालुक्यातून युपीएससी उत्तीर्ण होणारी ती पहिली विद्यार्थीनी ठरली आहे. अपंगात्वर मात करीत तिने देशात ९४८ वी रँक मिळवली आहे.

मोरणा धरणाच्या कुशीत वसलेल्या पास्टुल या छोट्याशा गावातील कू.रेणुका केकन हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. पातूर तालुक्यातून युपीएससी उत्तीर्ण होणारी ती पहिली विद्यार्थीनी ठरली आहे. अपंगात्वर मात करीत तिने देशात ९४८ वी रँक मिळवली आहे.

2 / 5

रेणुका केकन हिचे वडील दिनेश केकन हे पातूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. तर आई गृहिणी असून लहानपणापासूनच प्रशासनात जाऊन समाजासाठी काम करण्याचे स्वप्न रेणूका हिने पाहिले होते.

3 / 5

रेणुका केकन हिचे बारावीपर्यंतचे शिक्षण पातूर येथील तुळसाबाई कावल विद्यालयात पूर्ण झाले होते. बारावीत विभागातून तिने प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

4 / 5

रेणुका हीने पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली होती. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत यश संपादन केले आहे.

5 / 5

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रेणूकाचे हे यश प्रेरणादायी ठरत असून पातूर तालुक्यात तिच्या यशाबद्दल आनंदाचे वातावरण आहे. विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील, शिक्षक आणि मित्रपरिवाराला दिले आहे. सातत्याने मेहनत केल्यास कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, असा संदेशही तिने दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us