
ज्या लहान मुलांमध्ये हाडांची समस्या जाणवते, किंवा ज्या चिमुकल्यांची हाडं कमजोर असतात, त्यांच्या एक विचित्र प्रकारची कंडिशन आढळून येते. या कंडिशनला रिकेट्स असं मेडिकल क्षेत्रात ओळखलं जातं. यालाच सुखा असंही म्हणतात. सुख्यामुळे लहान मुलांची हाड कमकुवत होतात. एनडीटीव्हीनं दिलेल्या एका वृत्तानुसार रिकेट्सच्या रुग्ण सध्या भारतात वेगानं वाढत आहेत. दिल्लीतील The Indian Spinal Injuries Centre (ISIC) नं दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात दर महिन्याला जवळपास 12 रिकेट्सच्या केस समोर आल्या होत्या. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे रिकेट्स आढणाऱ्या रुग्णांचं वय हे दोन ते बारा वर्ष असल्याचंही दिसून आलंय. त्यामुळे वेळीच रिकेट्सचा धोका ओळखून सतर्क होण्याची गरज आहेत.

विटॅमिन डी कमी असलेल्या मुलांमध्ये रिकेट्स होतो. यामध्ये शरीरातील हाडं कमकुवत आणि नरम होऊन जातात. विटामीन डी शरीराला दोन प्रकारे मिळलं. एकतर सूर्यकिरणांमुळे आणि दुसरं म्हणजे आहारातून. सूर्यकिरणांमध्ये अल्ट्राव्हायलेट किरमं असतात. या किरणांमुळे शरीरार विटामीन डीची निर्मिती नैसर्गिक प्रक्रियेद्वारेच होते. विटामीन डी कॅल्शियम आणि फॉसफेट हाडांना पुरवतं. यामुळे हाडं अधिक मजबूत आणि नैसर्गिकरीत्या विकसीत होतात.

जर विटामीन डी योग्य प्रमाणात मिळालं नाही, तर हाडं कमजोर होऊन नरमही होऊन जातात कारण विटामीन डीच्या कमतरतेमुळे हाडांना कॅल्शियम आणि फॉसफेटचा उणीव जाणवते. काहीवेळानंतर हाडं वेडीवाकडी होतात, ज्याला रिकेट्स असं म्हणतात. सहा महिन्यांपासून चार वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये रिकेट्सचा त्रास दिसून येतो.

रिकेट्स नेमका आपल्या मुलांना झाला आहे की नाही, हे ओळखण्याचे काही सोपे पर्याय आहे. त्यातील तीन पर्याय हेही फार महत्त्वाचे आहेत. 1. ज्या मुलांना चालणं, धावणं, उभं राहणं या गोष्ट करणं नीट जमत नाही, त्यांच्यामध्ये रिकेट्स झालेला असण्याचा धोका असतो. 2. ज्या चिमुकल्यांच्या हाडांमध्ये किंवा जिथं हाडं जोडली जातात तिथं सूज असणं, हे देखील एक रिकेट्सचं महत्त्वाचं लक्षण आहे. 3. मनगटात किंवा गुडख्यात सूज असणं, हे रिकेट्सचं प्रमुख लक्षण मानलं जातं. त्याचप्रमाणे जर मुलांमध्ये दात नीट किंवा नैसर्गिकपणे येत नसतील, तरिही ते रिकेट्सचं किंवा विटामीन डीच्या कमतरतेचं लक्षण समजलं जातं.

रिकेट्स टाळण्यासाठी घरगुती आणि बिनखर्चाचे सोपे उपाय अवलंबता येऊ शकतात. यातील सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे आपल्या चिमुकल्यांना दिवसातला किमान अर्धा तास सूर्यप्रकाशात खेळू देणं किंवा त्यांना सूर्यप्रकाश मिळेल, अशा ठिकाणी घेऊन जाणं. यामुळे मुलांना नैसर्गिकपणे विटामीन डी मिळलं. लहान मुलांच्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचला पाहिजे, याची नितांत काळजी पालकांनी घ्यायला हवी. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार थंडीच्या दिवसात, कमी कपड्यात मुलांना बाहेर घेऊन जाऊ नये. दररोज चिमुकल्यांना किमान 20 ते 30 मिनिटं सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं असतं. आपल्या पाल्यांना आहार देताना त्यात विटामीन डी मिळेल, अशी खबरदारीही बाळगणं गरजेचं आहे. यासाठी मुळात विटामीन डी मिळतं कशातून हे समजून घ्यावं. दूध, फळांचा रस, मिल्क प्रॉडक्स आणि फिश ऑईल यामध्ये विटामीन डी मुबलक प्रमाणात असतं. या गोष्टींचा लहान मुलांच्या आहारात प्रकर्षानं वापर करावा.