माझ्या पर्मनंटसोबत डिनर डेट..; रिंकू राजगुरूच्या फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष

रिंकू राजगुरूच्या आयुष्यातील ही 'पर्मनंट' व्यक्ती नेमकी आहे तरी कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्याचं उत्तर खुद्द रिंकून एक फोटो पोस्ट करत दिलं आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

| Updated on: Apr 20, 2025 | 11:30 AM
1 / 5
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नुकतेच तिने तिच्या डिनर डेटचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमुळे रिंकू आयुष्यातील खास व्यक्तीबाबत चर्चा होऊ लागली आहे.

2 / 5
'माझ्या 'पर्मनंट'सोबत डिनर डेट' असं कॅप्शन देत रिंकूने हा खास फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे रिंकूच्या आयुष्यातील ही 'पर्मनंट' व्यक्ती कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला. काहींनी तर आकाश ठोसरचंही नाव सुचवलं होतं.

3 / 5
जेवणाचं ताट, उकडीचे मोदक आणि स्वत:चा सुंदर फोटो पोस्ट केल्यानंतर अखेर रिंकूने तिच्या आयुष्यातील त्या 'पर्मनंट' व्यक्तीचा खुलासा केला. रिंकूने त्या व्यक्तीसोबतचा फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

4 / 5
रिंकूच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधील या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलंय. रिंकूच्या आयुष्यातील 'पर्मनंट' व्यक्ती तिच्याइतकीच सुंदर असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

5 / 5
ही 'पर्मनंट' व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून रिंकू राजगुरूची आईच आहे. 'माझी पर्मनंट.. आई आणि मी' असं कॅप्शन देत रिंकूने हा फोटो पोस्ट केला आहे. त्याचसोबत नजर आणि हृदयाचा इमोजी तिने पोस्ट केला आहे.