Rinku Rajguru : आईची झेरॉक्स कॉपी! रिंकूचा लूक पाहून नेटकरी खुश, काय करते अभिनेत्रीची आई, काय आहे नाव ?
अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या नव्या गाण्यामुळे पुन्हा चर्चेत आहे. या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे तिचे पांढऱ्या साडीतील ग्रामीण लूकचे फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या साधेपणा आणि हेअरस्टाईलमुळे अनेकांना तिची आई आशा राजगुरू यांची आठवण झाली, "रिंकू आईसारखी दिसते" अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत. 'सैराट'पासून ते आत्तापर्यंतचा तिचा प्रवास आणि कौटुंबिक पाठिंबाही यानिमित्ताने अधोरेखित झाला आहे.

'सैराट' या गाजलेल्या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू अगदी कमी वयातच प्रचंड लोकप्रिय झाली. सैराटच्या यशामुळे ती घराघरांत पोहोचली, तिचे हजारो चाहते आहेत. त्यानंतर ती झिम्मा, कागर,आठवा रंग प्रेमाचा यासह अनेक चित्रपटात झळकली. सोशल मीडियावरही ती बरीच ॲक्टिव्ह असते. ( All Photos : Instgram / Social Media)

वेगवेगळे चित्रपट, काम, खणखणीत अभिनय यामुळे नेमही चर्चेत असणारी रिंकू राजगुरू नव्या गाण्यामुळे पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.

सध्या रिंकू तिच्या नव्या गाण्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. रिंकू आता पहिल्यांदाच म्युझिक अल्बममध्ये झळकली आहे. या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यातील एका फोटोने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले आहे. पांढऱ्या रंगाची साडी, हातात जेवणाचा डबा आणि साधा ग्रामीण लूक अशा रूपात दिसणाऱ्या रिंकूचे फोटो चाहत्यांना विशेष आवडले आहेत.

या फोटोमधील तिची हेअरस्टाईल, चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि एकूणच व्यक्तिमत्त्व पाहून अनेकांनी तिची आई आशा राजगुरू यांची आठवण काढली. "रिंकू अगदी तिच्या आईसारखी दिसते," अशा अनेक कमेंट्स येत असून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

रिंकूचे फोटो व्हायरल झाले असून तिच्यावर लाइक्सचा वर्षाव होतोय. रिंकू राजगुरू ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील आहे. तिचे कुटुंबीय आजही अकलूजमध्ये राहता, पण कामानिमित्त रिंकूला मुंबईत वास्तव्यास असावे लागते. असं असलं तरी जेव्हा तिला वेळ मिळतो, तेव्हा सर्वांना भेटण्यासाठी ती लगेच अकलूजला धाव घेते.

आशा राजगुरू या रिंकूची आई असून त्या शिक्षिका आहेत. तिचे वडीलही शिक्षक असल्याने घरात लहानपणापासूनच शैक्षणिक वातावरण होतं. मात्र रिंकूने तोच मार्ग न चोखाळता अभिनयाची वेगळी वाट निवडली. तिने जेव्हा अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पालकांनी , कुटुंबियांनी तिला पाठिंबा देत मनापासून साथ दिली. चित्रपटानंतर रिंकूने आता म्युझिक अल्बममधून तिची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

रिंकू आता पहिल्यांदाच म्युझिक अल्बममध्ये झळकली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. या अल्बनमंतर ती आता कोणत्या चित्रपटात दिसणार हे जाणून घेण्याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.