रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोर रितेशच्या मांडीवर बसली जिनिलिया; फोटो शेअर करताच कमेंटचीच चर्चा, म्हणाली…

Riteish Deshmukh: रितेश देशमुखने जिनिलियासोबतचा लंच डेटमधील खास फोटो शेअर केला आहे. रितेशच्या मांडीवर बसून त्याला पिझ्झा भरवणाऱ्या जिनिलियाच्या फोटोसोबतच तिच्या मजेशीर कमेंटचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 24, 2026 | 1:50 PM
1 / 5
Riteish-Genelia Deshmukh: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना नेहमीच भावते. सोशल मीडियावरही ही जोडी एकमेकांसोबतचे मजेशीर आणि रोमँटिक क्षण शेअर करत असते. आता रितेशने शेअर केलेला असाच एक फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या फोटोमधील दोघांचा अंदाज जितका खास आहे, तितकीच जिनिलियाने केलेली कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे.

2 / 5

रितेश देशमुखने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेश आणि जिनिलिया एका रेस्टॉरंटमध्ये लंच डेट एन्जॉय करताना दिसत आहेत. दोघांनीही बेबी पिंक रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यामुळे त्यांचं ट्विनिंगही चाहत्यांच्या नजरेत भरलं आहे. मात्र, या फोटोमधील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे जिनिलिया चक्क रितेशच्या मांडीवर बसली आहे.

3 / 5

रेस्टॉरंटमध्ये आजूबाजूला इतरही लोक जेवण करताना दिसत आहेत. तर जिनिलिया रितेशच्या मांडीवर बसून त्याला पिझ्झाचा घास भरवताना दिसतेय. दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद आणि एकमेकांसोबतचा हा मोकळा अंदाज पाहून चाहत्यांनी फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. टेबलवर पिझ्झा, पास्ता आणि स्पेगेटीसारखे पदार्थही दिसत आहेत. त्यामुळे ही दोघांची खास लंच डेट असल्याचं फोटोवरून लक्षात येतं.

4 / 5

या फोटोला रितेशने दिलेलं कॅप्शनही तितकंच मजेशीर आहे. त्याने 'Table for two, chair for one' असं लिहिलं आहे. म्हणजेच टेबल दोघांसाठी, पण खुर्ची मात्र एकच! जिनिलिया त्याच्या मांडीवर बसलेली असल्यामुळे हे कॅप्शन फोटोला अगदी चपखल बसतं. रितेशच्या या एका ओळीनेच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

5 / 5

रितेशच्या या पोस्टवर जिनिलियानेही मजेशीर कमेंट केली आहे. 'Confused which one is the meal' असं तिने लिहिलं आहे. म्हणजेच 'जेवण नेमकं कोण आहे, याबाबत संभ्रम आहे', असा तिच्या कमेंटचा गमतीशीर अर्थ होतो. जिनिलियाच्या या रोमँटिक आणि खोडकर कमेंटवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोघांमधील प्रेमळ नातं आणि एकमेकांची फिरकी घेण्याची शैली पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us