Rohit Sharma : ऋषभ पंत याच्या घाणेरड्या सवयीबद्दल रोहित शर्मा बोलला स्पष्टच, म्हणाला, हातानेच..
भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा याचा शो तूफान चर्चेत आहे. त्यातच रोहित शर्मा याला नुकताच मोठा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रोहित शर्मा याने ऋषभ पंत याच्या वाईट सवयींचा पाडा वाचला.

भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा तूफान चर्चेत आहे. रोहित शर्मा त्याच्या शोमुळे अधिक चर्चेत आहे. रोहित शर्मा याने नुकताच एका भारतीय खेळाडूबद्दल मोठा खुलासा केला. हेच नाही तर या खेळाडूसोबत फिरायला जायला अजिबात आवडणार नसल्याचे त्याने म्हटले.
रोहित शर्मा हा फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा या शोमुळे चर्चेत आहे. शोमध्ये रोहित शर्मा याने ऋषभ पंत याची चांगलीच मोठी पोलखोल केली. रोहित शर्मा याला विचारण्यात आले की, कोणत्या क्रिकेटरसोबत तुम्हाला फिरायला जायला आवडणार नाही.
यावर रोहित म्हणाला की, आम्ही बाराही महिने फिरतच असतो. त्यामुळे मला क्रिकेटरसोबत सुट्टी घालवायला आवडणार नाही. पण मुलगा आहे, तो गोड आहे.. पण खूप जास्त खोडकर आहे. त्याला कधीच मी सुट्टीवर कुठे फिरायला घेऊन जाऊ शकत नाही. हा मुलगा दुसरा तिसरा कोणीही नसून ऋषभ पंत आहे.
ऋषभ पंतची घाणेरडी सवय आहे.जेव्हाही ऋषभ पंत हा तुमच्यासोबत जेवायला बसतो, त्यावेळी तो तुमच्या ताटात हात घालून हाताने जेवतो. शेजारी चमचा ठेवला असतानाही तो कधीच चमचाने खाणार नाही. तो तुमच्या ताटातील हातानेच खाणार.
ऋषभ पंतची ही सवय अत्यंत घाण आहे. त्यामुळे मला त्याच्यासोबत कधीच सुट्टीवर जाण्यास आवडणार नाही. माझा तो मित्र आणि माझा भाऊ देखील. असे म्हणत तो थेट हात जोडताना देखील दिसत आहे.