प्रचंड बोल्ड चित्रपट, नाव ऐकूनच सापडला वादात, भारतात घालण्यात आली बंदी, पण विदेशात ठरला सुपरहिट

1996 चा सर्वात रोमँटिक आणि प्रचंड बोल्ड सीन असणारा चित्रपट. ज्याला भारतात करण्यात आले बॅन. पण विदेशात ठरला सुपरहिट. चित्रपटाचे नावच होते वादग्रस्त.

| Updated on: Feb 20, 2026 | 2:08 PM
1 / 6
हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट असे असतात, जे वादाच्या भोवऱ्यात अडकतात. देशांतर्गत बंदीला सामोरे जातात; मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळवतात.

हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट असे असतात, जे वादाच्या भोवऱ्यात अडकतात. देशांतर्गत बंदीला सामोरे जातात; मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळवतात.

2 / 6

अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे 1996 मध्ये प्रदर्शित झालेला ‘Kama Sutra: A Tale of Love’. हा केवळ चित्रपट नव्हता तर प्रदर्शित झाल्यापासूनच तो एक मोठा सांस्कृतिक आणि सेन्सॉरशिपविषयक वाद ठरला.

3 / 6

16व्या शतकाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग राजस्थानातील भव्य महाल आणि ऐतिहासिक स्थळांवर चित्रित झाले. या चित्रपटातील सीन आणि कलात्मक मांडणीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष दाद मिळवली.

4 / 6

भारतामध्ये या चित्रपटाला CBFC ने स्पष्ट लैंगिक सीन आणि राजघराण्यांतील वेश्यांच्या सीनमुळे बंदी घातली. अधिकाऱ्यांच्या मते, हा चित्रपट भारतीय परंपरा आणि इतिहासाचे चुकीचे चित्रण करतो.

5 / 6

मीरा नायर यांनी जवळपास दोन वर्षे सेन्सॉरशिपविरोधात लढा दिला. न्यायालयीन संघर्षानंतर 1997 मध्ये काही सीनवर कात्री चालवून चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्र देण्यात आले आणि तो कट व्हर्जनमध्ये प्रदर्शित झाला.

6 / 6

सुमारे 12 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जागतिक स्तरावर सुमारे 8.6 मिलियन डॉलर्सची कमाई केली. ‘Kama Sutra: A Tale of Love’ हा चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चित बंदी घातलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us