
टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक ही नेहमीच चर्चेत असते. चार वर्षे अभिनव शुक्ला याला डेट केल्यानंतर अभिनव शुक्ला याच्यासोबत रुबीना दिलैक हिने लग्न केले. आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच रुबीना दिलैक चर्चेत असते.

गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे. रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट असून आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. यामुळे चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण हे बघायला मिळाले.

रुबीना दिलैक हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये रुबीना दिलैक ही आपल्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर थेट भाष्य करताना दिसली आहे.

रुबीना दिलैक म्हणाली की, अशा चर्चांचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. कारण मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. तिथे अशा गोष्टींबद्दल चर्चा होणे स्वाभाविक आहे.

रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट नसल्याचे देखील पुढे आले. रुबीना दिलैक ही बिग बाॅसची विजेती असून अभिनव याच्यासोबत रुबीना दिलैक ही बिग बाॅसमध्ये सहभागी झाली होती.