‘काय, तुझं एका नेत्याशी लग्न झालंय?’, सोनाली कुलकर्णीच्या बहिणीला कळताच… काय आहे किस्सा

सोनाली कुलकर्णीचे एका राजकीय नेत्यासोबत लग्न झाले आहे अशा अफवा होत्या. त्यावर सोनालीने प्रतिक्रिया देता पूर्णविराम दिला आहे. या अफवांच्या वेळी सोनालीच्या बहिणीला जेव्हा कळाले तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती समोर आले आहे.

| Updated on: Aug 07, 2025 | 7:30 PM
1 / 5
मरीठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिने मराठी, हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्ये सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण एक वेळ अशी होती जेव्हा सोनालीच्या खासगी आयुष्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.

2 / 5
सोनालीचे एका राजकीय नेत्यासोबत लग्न झाले आहे आणि त्याने तिला राहण्यासाठी घर दिले अशा अफवा होत्या. आता सोनालीने नुकताच एका कार्यक्रमात यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच तिने बहिणीला कळल्यावर काय प्रतिक्रिया होती हे देखील सांगितले आहे.

3 / 5
सोनालीने नुकताच 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना सोनालीने तिच्या लग्नाबाबतच्या अफवांवर भाष्य केले. ती म्हणाली, "माझं एका राजकीय नेत्याशी लग्न झाले आहे आणि त्याने मला राहायला घर दिले अशा चर्चा पसरल्या होत्या. जेव्हा ही अफवा पसरली, तेव्हा मला अनेकांचे फोन येऊ लागले."

4 / 5
पुढे ती बहिणीला जेव्हा कळाले तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती हे सांगताना म्हणाली, "माझ्या चुलत बहिणीनेही मला फोन करून विचारलं, 'काय, तुझं लग्न झालंय का?' मी तिला म्हणाले, 'अगं, माझं लग्न झालं असतं तर मी तुला लग्नाला बोलवलं नसतं का? तू माझी बहीण आहेस ना!' ती म्हणाली, 'नाही, घाईगडबडीत राहून गेलं असेल.' मी म्हणाले, 'असं कसं राहील? तू काय बोलतेस!'

5 / 5
"मग तिने सांगितलं की, लोक म्हणत आहेत तुझं एका नेत्याशी लग्न झालंय आणि त्याने तुला घर दिलंय. मी काही क्षण थक्क झाले. पण असं काहीच नव्हतं. या केवळ निराधार अफवा होत्या..." असे सोनाली म्हणाली.