
बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. तो पत्नी, सुनिता अहूजाला खरोखर घटस्फोट देणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सुनिताने गोविंदावर गंभीर आरोप केले असून वांद्रे कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे बोलले जात आहे. आता यावर गोविंदाच्या वकिलांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते नेमकं काय म्हणाले? चला जाणून घेऊया...

गोविंदाचे वकील ललित बिंद्रा यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अभिनेता आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यातील घटस्फोटाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. ललित म्हणाले, "कोणताही खटला नाही, सगळं मिटत आहे, लोक जुन्या गोष्टी उकरून काढत आहेत.

पुढे सूत्रांनी असेही सांगितले की, "आता गणेश चतुर्थी येईल, तुम्हाला गोविंदाचे सगळे कुटुंबीय एकत्र दिसतील, तुम्ही घरी या."

काल हाउटरफ्लायच्या एका अहवालात दावा करण्यात आला होता की सुनीता आहुजाने गोविंदाविरुद्ध वांद्रे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत व्यभिचार, क्रूरता आणि परित्याग यांचा उल्लेख केला होता.

डिसेंबर 2024 मध्ये दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की गोविंदा वारंवार सुनावणीला अनुपस्थित राहिला आणि न्यायालयाने नियोजित केलेल्या समुपदेशन सत्रांमध्येही सहभागी झाले नाहीत. तसेच सुनीता प्रत्येक सुनावणीला उपस्थित होती.

ही पहिलीच वेळ नाही जेव्हा या बॉलिवूड जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवा सुरु झाल्या. यावर्षी फेब्रुवारीत, अनेक माध्यमांच्या अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की गोविंदा आणि सुनिता आहुजा यांनी सततच्या मतभेदांमुळे आणि भिन्न जीवनशैलीमुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. असेही सांगितले गेले होते की गोविंदाची एका मराठी अभिनेत्रीशी वाढती जवळीक ही त्यांच्या कथित विभक्त होण्याचे मुख्य कारण आहे.

नंतर, त्यांच्या वकिलाने सांगितले होते की जरी दोघांनी सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, तरी ते पुन्हा एकत्र येत आहेत. गोविंदाचे कौटुंबिक मित्र ललित बिंदल यांनी सांगितले की गोविंदा आणि सुनीता "मजबूत नात्यात" आहेत आणि ते नेहमी एकत्र राहतील.