Sachin Pilgaonkar: सचिन पिळगावकर यांचा मुलगा आहे प्रसिद्ध गायक, पहिल्यांदाच केला खुलासा
Sachin Pilganokar News; सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मुलाविषयी बोलून दाखवले आहे.

अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांना एकुलती एक मुलगी आहे आणि जिचं नाव श्रिया पिळगांवकर आहे. पण सचिन पिळगांवकर एका गायकाला आपला लेक माणला आहे.
सचिन पिळगांवकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या लेकाबद्दल बोलून दाखवले आहे. तो माझा मुलगा आहे, श्रियासारखाच काळजाता तुकडा आहे तो, असं या मुलाखतीत म्हणाले.
सचिन पिळगांवर यांनी या गायकासोबत कामही केले आहे. त्यांच्या अनेक चित्रपटासाठी त्याने गाणं गायले आहे. एवढचं कशाला त्यांच्या चित्रपटात तो झळकलाही आहे.
हा गायक म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार गायक सोनू निगम आहे. सचिन यांनी सोनू निगमबद्दल असं विधान केले नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
गपशप विथ फिरदौस रफी या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर सोनू निगमबद्दल म्हणाले की, "सोनूने मला सांगितले की तुम्ही प्लेबॅक सिंगर म्हणून जाल ना तिथे वाद घालत बसू नका, तुम्हाला जे शिकवले जाईल तेवढं शिका. तुमचा कम्पोझर खूश आहे की नाही तुम्ही तितकेच पाहा."