AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरविंद केजरीवाल यांना सलग दुसऱ्या दिवशी मोठा झटका; आणखी एका आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

अरविंद केजरीवाल यांना सलग दुसऱ्या दिवशी मोठा झटका बसला आहे. आता आणखी एका आमदाराने तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

अरविंद केजरीवाल यांना सलग दुसऱ्या दिवशी मोठा झटका; आणखी एका आमदाराचा तडकाफडकी राजीनामा
arvind kejriwal newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 12:28 PM
Share

पंजाबमध्ये आम आदमी पक्षात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सलग दोन दिवसांत तीन आमदारांनी पक्षाची साथ सोडली आहे. अमृतसर उत्तरमधून आमदार कुंवर विजय प्रताप सिंह यांनी पंजाब विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाकडे राजीनामा दिला .

कुंवर विजय प्रतापसिंह यांच्याआधी आमदार चेतन सिंह जौरामाजरा आणि आमदार हरमीत सिंह पठानमाजरा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय.  कुंवर विजय प्रताप सिंह माजी आयपीएस अधिकारी आहेत. ते पंजाबमध्ये सेवा बजावत होते. त्यांनी 2015 सालच्या एका गोळीबार प्रकरणाच्या तपासात सहभागी होते. या प्रकरणानंतर पुढे त्यांनी  आम आदमी पक्षात प्रवेश केला. कुंवर विजय प्रताप सिंह यांचं भगवंत मान सरकारसोबत मतभेद झाले होते. त्यांच्यावरील मतभेद चव्हाट्यावर देखील येत होते.  गोळीबार प्रकरणात न्याय मिळण्यास विलंब होऊ लागल्याने सरकारवर टीका केली होती. विधानसभेच्या एका समितीचा देखील अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

विजय प्रताप सिंह यांनी सरकार आम आदमी पक्षाच्या धोरणावरून भरकटत असल्याा आरोप केला. पंजापमध्ये वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचं सेवन, खंडणी , गुंडगिरीला आळा घालण्यास अपयश आल्याचाही आरोप केला.  पक्ष आणि सरकारमध्ये गुंड आणि त्यांच्या कुटुंबीयांचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. 2025 साली विषारी दारू दुर्घटनेतील मृत्यू आणि दारू माफियांचा मुद्दा उपस्थित केला होता.  त्याच साली अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अटक झाली होती. त्यावेळी कुंवर विजय प्रताप यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मजीठिया यांच्या वैचारिक मतभेद आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई अनैतिक असल्याचा आरोप केला होता. दरम्यान,  कुंवर विजय प्रदाप यांनी पक्षविरोधी वक्तव्ये केल्याचे सांगून आम आदमी पक्षाने पाच वर्षांसाठी निलंबित केले आहे. आता थेट त्यांच्या आमदरकीच्या राजीनाम्याने आम आदमी पक्षापुढे नवं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे पक्षापुढील संकट कसं हाताळतात, हे पाहावे लागेल.

Follow Us
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ...
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणादरम्यान काय घडलं?
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट..
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत, आरोग्याला मोठा धोका
इंडिया आघाडीची महारॅली नव्हे, हे तर लोकशाही वाचवण्यासाठीचे बंड; संजय..
इंडिया आघाडीची महारॅली नव्हे, हे तर लोकशाही वाचवण्यासाठीचे बंड; संजय राऊतांचं विधान
मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या राज्यांना ...
Weather Alert: मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या 3 राज्यांना तातडीने अलर्ट जारी
वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; CM फडणवीसांना पत्राद्वारे...
सोयगावमधील वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; फडणवीसांना पत्र लिहित केली मोठी मागणी!
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, कारण काय?
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, नेमकं कारण काय?
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद,
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद, ठाकरे गट रस्त्यावर
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात...
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलनाची तयारी!
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनग
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनगाचे छोटे टोक! आणखी...