मोरपंखी साडीत सारा तेंडुलकरचा पारंपारिक लुक, हिऱ्याच्या दागिन्यांनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

सारा तेंडुलकरने तिचा गणेशोत्सवासाठी खास पारंपरिक लूक केला असून तिने तिचे साडीमधील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Updated on: Sep 16, 2026 | 1:33 PM
1 / 5
गणेशोत्सवाच्या उत्साहात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने आपल्या पारंपरिक लूकने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गणेशोत्सवाच्या उत्साहात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने आपल्या पारंपरिक लूकने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

2 / 5

गणेशोत्सवानिमित्त साराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले असून, तिच्या या सुंदर लूकची सध्या चर्चा होत आहे.

3 / 5

या खास प्रसंगी साराने मोरपंखी रंगाची भरजरी जरीकाम आणि आकर्षक एम्ब्रॉयडरी असलेली पारंपरिक साडी नेसली आहे. या साडीला तिने हेवी डिझायनर स्लीव्हलेस ब्लाऊजची जोड दिली आहे.

4 / 5

पारंपरिक साडी आणि आधुनिक ब्लाऊजचा हा सुंदर मिलाफ तिच्या लूकला एक वेगळाच अंदाज देताना दिसत आहे. आपला लूक अधिक खुलवण्यासाठी साराने कुंदन आणि अनकट डायमंडने सजवलेला जड नेकलेस परिधान केले आहेत.

5 / 5

या पारंपरिक दागिन्यांमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. साराने केसांची आकर्षक स्टाईल करत त्यात पांढऱ्या मोगऱ्याचा ताजा गजरा माळला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us