Arjun Tendulkar-Saaniya Chandhok : लग्नानंतरची पहिली दिवाळी, अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोकचा रोमँटिक अंदाज, पेस्टल साडीमध्ये खुलून आलं सचिनच्या सुनेचं सौंदर्य PHOTOS

Arjun Tendulkar-Saaniya Chandhok : दिवाळी हा आनंदाचा सण आहेच. पण लग्नानंतरची पहिली दिवाळी ही जास्त खास असते. लग्नानंतर कुठल्याही जोडप्याच्या आयुष्यात पहिल्या दिवाळीचं विशेष स्थान असतं. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकही याला अपवाद नाहीयत.

| Updated on: Nov 10, 2026 | 9:43 AM
1 / 5
अर्जुन तेंडुलकर हा भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. याचवर्षी अर्जुन तेंडुलकरच सानिया चंडोक बरोबर लग्न झालं. दिवाळीचे असे खास क्षण सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातही पहायला मिळाले. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकने लग्नानंतरची पहिली दिवाळी खास अंदाजात सेलिब्रेट केली.

अर्जुन तेंडुलकर हा भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. याचवर्षी अर्जुन तेंडुलकरच सानिया चंडोक बरोबर लग्न झालं. दिवाळीचे असे खास क्षण सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातही पहायला मिळाले. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकने लग्नानंतरची पहिली दिवाळी खास अंदाजात सेलिब्रेट केली.

2 / 5

या सेलिब्रेशनचे फोटो सानिया चंडोकने सोशल मीडियावर शेअर केलेत. ज्यात ती पती अर्जुन तेंडुलकर सोबत रोमँटिक पोजमध्ये दिसतेय. या फोटोंमधून दोघांची केमिस्ट्री सर्वांच लक्ष वेधून घेतेय. दोघांचं फेस्टिवल फॅशन सुद्धा शानदार आहे.

3 / 5

सानिया हल्क्या गुलाबी रंगाच्या साडीमध्ये खूप ग्रेसफुल दिसत आहे. अर्जुनने निळ्यारंगाचा डिझाईनवाला कुर्ता परिधान केलाय. त्यात तो रॉयल लूकमध्ये दिसतोय. दोघांचे फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

4 / 5

सानिया चंडोकने दिवाळी सेलिब्रेशनचे जे फोटो शेअर केलेत, त्यात तिची आणि अर्जुनची केमिस्ट्री स्पष्टपणे दिसतेय. एका फोटोमध्ये अर्जुन आणि सानिया सेल्फी घेतायत. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतय. दोघांच्या कपाळावर टिळा आहे.

5 / 5

दुसऱ्या फोटोत सानिया पती अर्जुनच्या खांद्यावर डोक टेकवून पोज देताना दिसतेय. सानियाने 'पहिली दिवाळी' असं फोटोंना कॅप्शन दिलं आहे. सानियाने हल्की गुलाबी रंगाची पेस्टल पिंक शेडची साडी निवडली आहे. त्यात ती खूप सुंदर दिसतेय. साडीवर थ्रेड वर्क आणि फ्लोरल एम्ब्रॉयडरी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us