
'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद कायम तिच्या विचित्र फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते. अनेकदा या चिंता विचित्र ड्रेसमुळे तिला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. नुकतेच तिने सेफ्टी पिनच्या साहाय्याने तयार केलेला ड्रेस घालून फोटोशूट केलं आहे. तिचा हा ड्रेसपाहून नेटकऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत.

उर्फीने हा ड्रेस पूर्णता सेफ्टी पिनच्या मदतीने बनवण्यात आला आहे. या ड्रेसची निर्मिती करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला आहे बट लूक ऍट दिस असे कॅप्शन लिहित तिने सेफ्टी पिन घातलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

बिकिनीवर सेफ्टी पिनचा ड्रेस घालून डान्स केलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. काही तासांपूर्वी केल्या पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने मासे पकडण्याचा ड्रेस घाटाळा असल्याचे म्हटले आहे.

याआधी उर्फीने सांगितले होते की ती स्वतः तिचा ड्रेस तयार करते. ती ड्रेस कट करते आणि नवीन डिझाइन तयार करते. यापूर्वीही उर्फीने फोट्रो कॉपीजपासून बनवाण्यात आलेला ड्रेस घातला होता.

उर्फीच्या या चित्रविचित्र फॅशनमुळे अनेकदा नेटकऱ्यांकडून ट्रोलही झाली आहे. मात्र तरी कुणालाही ना जुमानता आपलया हव्या तश्या फॅशनचे ड्रेस घातलत असते.