याआधी सैफ अली खानला मुंबई पोलिसांची सुरक्षा कधीही नव्हती. मात्र आता या हल्ल्यानंतर ही सुरक्षा देण्यात आली आहे.

याआधी सैफ अली खानला मुंबई पोलिसांची सुरक्षा कधीही नव्हती. मात्र आता या हल्ल्यानंतर ही सुरक्षा देण्यात आली आहे.

सैफला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिस बंदोबस्तात तो घरी पोहोचला.

सैफला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिस बंदोबस्तात तो घरी पोहोचला.

दरम्यान, या घटनेनंतर सैफ अली खानने त्याची सुरक्षा टीम बदलल्याचीही बातमी आहे. आता त्याच्या सुरक्षेची जबाबदारी प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयच्या हाती असणार आहे. सैफ अली खाननेही त्याला हे काम दिले असल्याचे बोलले जात आहे.

रोनित रॉय ‘एस सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन’ नावाची संस्था चालवतो ज्यामध्ये तो सुरक्षा रक्षक पुरवण्याचं काम करतो. त्यामुळे आता सैफसाठीचे सुरक्षा रक्षक तोच देणार आहे. रोनित रॉयचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये तो म्हणतो, ‘आम्ही सैफसोबत आधीपासूनच आहोत. तो आता ठीक आहे आणि परत आला आहे.

रोनित रॉय त्याच्या सुरक्षा एजन्सी अंतर्गत चित्रपट उद्योगातील अनेक बड्या स्टार्सना सुरक्षा पुरवतो. त्यात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, करण जोहर, कतरिना कैफ ते आमिर खान यांसारख्या मोठ्या सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.

सैफला दिलेल्या या तगड्या पोलीस संरक्षणामुळे पापाराझी, किंवा फॅन्स यांना पहिल्यासारखं सहज सैफ अली खानजवळ जाता येणार नाही.